पिकपाणी

इसबगोल : रब्बीत भरगोस उत्पन्न मिळवून देणारे पीक !

Shares

जगभर इसबगोल (Isbagol) ची निर्यात (Export) भारतातून केली जाते. इसबगोल ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. इसबगोल पिकाचे बी शीतल , शामक, असते. सौंदर्यप्रसाधनात याचा वापर केला जातो. बद्धकोष्टता, पचनसंस्था आदींच्या तक्रारींवर उत्तम उपाय म्हणून याचा उपयोग केला जातो.शरीरातील टाकाऊ घटक बाहेर पडण्यास ही वनस्पती मदत करते. वजन कमी करण्यास ही वनस्पती मदत करते. आपण गुणधर्मांनी संपूर्ण अश्या वनस्पतीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
इसबगोलची भुशी बुद्धकोष्ठता, अल्सर, आमांश, मूळव्याध, अतिसार, आंतरसूज, लठ्ठपणा, प्रदररोग, पित्त, संधिवात इत्यादी रोगांवर उपयोगी आहे. याव्यतिरिक्त इसबगोल ची भुशी खाद्यपदार्थांमध्ये आइस्क्रीम, जेली अशा अनेक ठिकाणी वापरतात. इसबगोल भुशीमध्ये प्रोटिन, सेल्युलोज, स्टार्च, म्युसीलेज व तेल हे मुख्य घटक आहेत. तेलात स्टेरिक, लिग्नोसेटिक आणि पालमीटिक आम्ल हे घटक आहेत, तर बियांमध्ये लिनोलिक आम्ल असते.याची बाजारात चांगली मागणी आहे.इसबगोल चे अनेक फायदे आहेत. त्यामुळे जगभर याची मागणी आहे. दुसऱ्या देशात याची निर्यात केल्यास जास्त पटीने नफा होतो.

ही वाचा (Read This ) आपण गुणधर्मांनी संपूर्ण अश्या वनस्पतीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत

लागवड पद्धत

१. इसबगोल हे रब्बी हंगामातील पीक असून, याची झाडे ३० ते ४० सें.मी. वाढतात.
२. झाडाला खोड नसून गव्हाप्रमाणे दांडे असतात. पाने ७.५ ते २० सें.मी.पर्यंत लांब व १ सें.मी.पर्यंत रुंद असतात.
३. संपूर्ण झाडावर व पानावर पांढर्‍या केसांची लव असते. इसबगोलच्या झुडपास जमिनीपासून ५ ते १० फांद्या येतात व २० ते ४५ फुटवे येऊन जवळजवळ प्रत्येक फुटव्याला गव्हासारखी असतात. परंतु लहान ओंबी येते.
४. इसाबेल पीक हलक्या ते मध्यम प्रतीच्या वाळूमिश्रित किंवा लाल मातीच्या जमिनीत चांगल्या प्रकारे वाढते.
५. या पिकासाठी उत्तम निचरा होणारी जमीन योग्य असते. खरीप हंगामातील पीक काढल्यानंतर नांगरणी करून कुळवाच्या १ ते २ पाळ्या द्याव्यात व जमीन भुसभुशीत करावी.
६. पेरणीपूर्वी शेणखत जमिनीत मिसळावे. शेत तयार झाल्यावर जमिनीच्या उतारानुसार ५ ते ८ फूट लांबी व ४ फूट रुंदीचे वाफे तयार करावेत.
७. पेरणीअगोदर प्रतिकिलो बियाण्यास ४ ग्रॅम या प्रमाणात मेटॅलॅक्झील चोळून बीजप्रक्रिया करावी.
८. बी फेकून झाल्यावर हलक्या हाताने किंवा झाडूने बी झाकावे, त्याचप्रमाणे ३०सें.मी. अंतरावर काकर्‍या पाडून घ्याव्यात व त्यामध्ये बी पेरून नंतर मातीने झाकून घ्यावे. ९. अशा पद्धतीने पेरणी केल्यास हेक्टरी ४ ते ५ किलो बी पुरेसे होते. पेरणी झाल्यावर एक हलके पाणी द्यावे.
१०. बियांची उगवण ८ ते १० दिवसांनी सुरू होते.

ही वाचा (Read This ) महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना २०२२, मिळणार ५ हजार प्रतिमहा

काढणी

१. हे पीक ११० ते १३० दिवसांनी म्हणजेच मार्च – एप्रिलमध्ये पीक काढणीस तयार होते.
२. यावेळी पिकाचा रंग पिवळसर होऊन ओंब्या तपकिरी दिसतात.
३. त्याचप्रमाणे ओंब्या दाबल्यास त्यातून बी बाहेर पडते. ओंब्यांतील बी गळून पडण्याचे टाळण्यासाठी पिकाची काढणी सकाळी करावी.
४. कापणी जमिनीलगत झुडपाच्या बुंध्याजवळ करावी व लगेच गोळा करून १-२ दिवस गंजी मारून कापलेले पीक उन्हात वाळवावे.
५. नंतर मळणी व उफणणी करून भुशामधून बी वेगळे करावे.

हे ही वाचा (Read This ) शेतकरी मित्रांनो, SHCS या योजनेचा आपण लाभ घेतला आहे का ?

उत्पादन

प्रति हेक्टर प्रमाणे १० ते १२ क्विंटल इसबगोल चे बियाणे मिळते.

ही वाचा (Read This )  या राज्यात शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना देत आहे १० हजार रुपये आणि व्याजमुक्त कर्ज

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *