या राज्यात शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना देत आहे १० हजार रुपये आणि व्याजमुक्त कर्ज

Shares

सरकार शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना, उपक्रम राबवत असते. आंध्र प्रदेशातील सरकार शेतकऱ्यांनी नैसर्गिक पद्धतीने शेती करावी यासाठी महत्वाचे पाऊल उचलत आहे. शेतकऱ्यांना मागील काही महिन्यांपासून नैसर्गिक तसेच आर्थिक अश्या दुहेरी संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सरकारने एक नवीन उपक्रम सुरु केला आहे. राज्यातील ७० हजारांपेक्षा अधिक भूधारक शेतकऱ्यांना आणि विशेष करून महिलांना आर्थिक मदत करत आहे.

हे ही वाचा (Read This ) महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना २०२२, मिळणार ५ हजार प्रतिमहा
रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने केलेली शेती कमी खर्चात अधिक उत्तम होते. त्यामुळे संपूर्ण आंध्र प्रदेश राज्य २०३० पर्यंत नैसर्गिक शेती केली जाणारे राज्य बनवण्याचा उपक्रम आंध्र सरकारने हाती घेतला आहे. ३० जिल्ह्यातील भाडेकरू शेतकऱ्यांबरोबबर अनुसूचित जातीच्या ७१ हजार ५६० शेतकऱ्यांना १० हजार रुपये अनुदान आणि व्याजमुक्त कर्ज देण्यात येणार आहे. या उपक्रमांमुळे नक्की नैसर्गिक शेतीची संख्या वाढेल असा विश्वास सरकारला आहे.

हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळणार, असा करा अर्ज

प्रथम प्राधान्य महिलांना
महिला बचत गटाचे मोठे जाळे असल्यामुळे आम्ही सुरुवातीला महिला शेतकऱ्यांपासून या उपक्रमास सुरुवात करत आहोत असे महामंडळाचे व्यवस्थापक संचालक हर्षवर्धन यांनी सांगितले आहे. तसेच नैसर्गिक शेती करण्यामध्ये शेतकरी रस दाखवत असल्यामुळे लवकरच सर्व शेतकरी नैसर्गिकरित्या शेती करतील अशी आशा सरकारला आहे.

हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळणार, असा करा अर्ज

व्याजमुक्त कर्ज देणार ?
सरकार जे अनुदान देईल त्याचा उपयोग बियाणे खरेदीसाठी, मल्चिंग तसेच नैसर्गिक साहितीसाठी उपयुक्त असणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी करता येईल तसेच कर्जाच्या रकमेसाठी शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने नियोजन करावे लागणार आहे. हे नियोजन पाहून शेतकऱ्यांना व्याजमुक्त कर्ज दिले जाणार आहे. कर्जाच्या रकमेवर मर्यादा नसणार आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *