तेलबियाणांच्या किमती जशाच तश्या तर तेलाच्या वाढत्या किंमतीचे देशभर थैमान

Shares

कोरोना, लॉकडाऊनमुळे तेलबिया पिकांवर परिणाम झाला. तेलाच्या उत्पादनातही घट झाली असली तरी मागणी वाढतच राहिली. गेल्या दोन वर्षांपासून विविध नैसर्गिक आपत्तींमुळे तेलबिया पिकांचे, प्रामुख्याने सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल व इतर पिकांचे नुकसान झाले आहे.

देशभरात वाढत्या महागाईने थैमान घातले आहे. आपल्या दररोजच्या वापरात आवश्यक असणाऱ्या जवळ जवळ सर्वच गोष्टींचे दर वाढले आहेत. त्यात खाद्यतेलाचे दर तर विचारूच नका. ते तर दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

एके काळी पाम तेल हे २० ते २५ रुपये लिटर प्रमाणे मिळत होते. तर शेंगदाणे तेल सर्वात महागड्या तेलांपैकी एक होते. मात्र आता सर्व चित्रच बदलेले दिसत आहे. सूर्यफूल तेल आणि सोयाबीन तेलाच्या दराने शेंगदाणा तेलाच्या दराला मागे टाकले आहे.

मागील काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दरात एकच वाढत आहेत. दरात किलोमागे ७० रुपयांची वाढ झाली आहे. एकीकडे खाद्यतेलाचे भाव वाढत असताना तेलबियांचे हमी भाव मात्र वाढत नाहीत. या पिकांच्या हमीभावात जेमतेम वाढ केली जाते. त्यामुळे देशात खाद्यतेल बनवण्यासाठी तेलबियांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांनो त्वरित करा अर्ज – ३१ मार्च शेवटची तारीख, शेळीपालन,कुक्कुटपालन,शेतमाल आदीसाठी ६०% अनुदान अर्ज

तेलाच्या किंमतीत कशी झाली वाढ?

भारतात, पॅकेज्ड सनफ्लॉवर तेलाच्या किंमती फेब्रुवारीमध्ये अनुक्रमे ४% वाढल्या, तर मोहरीच्या तेलामध्ये ८.७% वाढ झाली. सोयाबीन तेलाचे दर ०.४% किरकोळ घसरले, तर वनस्पती तेलाच्या किंमती २.७% वाढले. भुईमुगाचे तेलाचे दर १% वाढले होते.

भारतात दरवर्षी अंदाजे २.५ ते ३ दशलक्ष टन सूर्यफूल तेलाचा वापर होतो. यातील जवळपास ७०% युक्रेनमधून आयात करण्यात येते.. रॉयटर्सच्या एका अहवालानुसार, २०२१ मध्ये युक्रेन आणि रशियाचा मिळून भारताच्या सर्व खाद्यतेलाच्या आयातीपैकी सुमारे 13% वाटा होता, जो १.६ दशलक्ष टन पुरवठा करतो.

तेलबियांणाच्या किमतीत वाढ करण्याची गरज

देशात १०५ लाख टन खाद्यतेलाचे उत्पादन होते आणि १४५ लाख टन आयात करावे लागते. खाद्यतेलाच्या आयातीवर अवलंबून राहणे धोकादायक आहे. त्यामुळे तेलबियांच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याची गरज आहे.

परिणामी तेलाच्या किमती वाढतच गेल्या. यासाठी सरकारने तेलबियांखालील क्षेत्र वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल आदींच्या आधारभूत भावातही वाढ करण्याची गरज आहे. तरच शेतकरी या पिकांकडे आणखी वळू शकेल.

बाजारात तेलबियांना हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी तेलबिया उत्पादनाकडे वळत नाहीत. त्यामुळे खाद्यतेलासाठी आयातीवर अवलंबून राहावे लागते. हे लक्षात घेऊन सरकारने किमान जून २०२२ पासून खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफुलाच्या मूळ किमती वाढ करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

हे ही वाचा (Read This ) असा काढा घरी बसून जमिनीचा ऑनलाईन नकाशा, महाभूमी अभिलेख

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *