शेती हा इतका शाश्‍वत धंदा असेल तर मातीचे महत्वही अबाधित आहे – एकदा वाचाच

Shares

नमस्कार मंडळी थोडं पण महत्वाचं आपल्या शेतीचा सर्वात प्रमुख आणि महत्वाचा घटक म्हणजे जमीन होय. ती म्हणजे आपल्या जमिनीतली काळी माती ही माती काही सगळीकडे सारखी नाही हे आपणास माहीत असेल येथे हर एका शेती मधे माती चा बदल दिसून येते. काही ठिकाणी ती पांढरीही आहे आणि काही भागात ती लाल ,पीवळी आहे. पण तरीही जमिनीला काळी आई म्हणतो. या पृथ्वीतलावर जमिनीत मशागत करून आणि पिके घेऊन शेती केली जाते. माणूस सुधारला आणि चंद्रावरच नव्हे तर सूर्यावर जरी गेला तरी त्याला पोटाला खायला काही तरी लागतेच.

उसासारखा दिसणारं हे गवत शेतकऱ्यांचे उत्पन्न तर वाढवेलच, पशुखाद्याचे संकट ही दूर करणार, दर 50 दिवसांनी काढणीस तयार

त्याने कितीही प्रगती केली तरी हे सत्य काही बदलणार नाही. त्यामुळे मानवी जीवनात कितीही बदल झाले आणि परिवर्तने झाली तरीही पोटाची खळगी कायम आहे आणि त्यामुळे शेती व्यवसाय अटळ आहे, शाश्‍वत आहे. कधी काळी या पृथ्वीतलावरची शेतीच बंद झाली आहे असे काही घडणार नाही आणि शेती हा इतका शाश्‍वत धंदा असेल तर मातीचे महत्वही अबाधित आहे. तेव्हा आपण ज्या मातीत शेती करणार आहोत ती माती नेमकी काय आहे याची नीट माहिती करून घेतली पाहिजे.

सतत येणाऱ्या पावसामुळे संत्रा व मोसंबीची मोठ्या प्रमाणावर फळगळ होत आहे? हा सल्ला नक्की वाचा

प्रत्येक शेतकरी हा काही किमान शास्त्रांची माहिती असणारा शास्त्रज्ञच असतो. नसेल तर तो तसा असला पाहिजेहे अशासाठी गरजेचे आहे की, आपल्या शेतातल्या मातीचा सुपीक थर म्हणजे काय आणि तो कसा तयार झालेला आहे हे त्याला माहीत असेल तरच त्याला त्या थराची किंमत कळेल आणि त्याचा लहानसाही थर वाहून जाता कामा नये याची तो खबरदारी घेईल. आपण ज्या मातीत मेहनत करतो ती माती मुळात खडकापासून तयार झाली आहे. ही पृथ्वी काही अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात आली आहे. ती नेमकी किती वर्षांपूर्वी अस्तित्वात आली यावर शास्त्रज्ञात वाद आहेत.

महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2022: ऑनलाइन अर्ज करा | नवीन अर्ज

प्रत्येकांच्या अंदाजात काही कोटी वर्षांचा फरक असेल. पण एवढे खरे की, ती अस्तित्वात आली तेव्हा तिच्या पृष्ठभागावर तीन चतुर्थांश पाणी होते आणि उरलेला एक चतुर्थांश भाग खडकाळ जमीन होती. म्हणजे आपण शेती करतो ती जमीन किंवा सुपीक माती या खडकांपासून बनलेली आहे. या खडकावर उष्णता, पाऊस, वारा, थंडी यांचे परिणाम होत गेले. दिवसभर उष्णता असते, त्यामुळे खडक तापून . रात्री तापमान कमी झाले की हेच खडक आकसत जाते. ही प्रक्रिया वर्षानुवर्षे सुरू राहिली आणि सुरू आहे. हे फुगवणं आणि आकसणं अतिशय सूक्ष्म असते. पण असे संस्कार होत होत दगडांची माती तयार व्हायला २५० कोटी वर्षांपेक्षाही अधिक काळ लागला आहे.हे सर्व प्रकारच्या खडकांच्या बाबतीत घडते.

[यादी] महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी नवी यादी 2022: जिल्हानिहाय लाभार्थी यादी

काही खडक मुळात ठिसूळ असते, त्यांच्या बाबतीत ही क्रिया लवकर घडते. पण मातीचा एक फुट जाडीचा थर तयार व्हायला १०० वर्षे लागतात. हे अशासाठी सांगत आहे की, पावसाळ्यात जोरदार पावसाने शेतातली माती वाहून जाते, हे किती मोठे नुकसान होत आहे हे कळावे म्हणून मी वारंवार सुचीत करतं असतों….

धन्यवाद विचार बदला जिवन बदलेल

मिलिंद जि गोदे

save the soil all together

milindgode111@gmail.com

mission agriculture soil information

लो टनेल फार्मिंग: पॉली हाऊसपेक्षा स्वस्त शेतीचे हे आधुनिक तंत्र, जाणून घ्या प्लास्टिकच्या बोगद्यातील शेतीचे फायदे

ड्रोन खरेदीवर 100% सबसिडी

४ महिला आमदारांची आर्थिक फसवणूक ; पुण्यात गुन्हा दाखल

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *