पिकपाणी

काळ्या मक्याची शेती, कोणत्याही हंगामात लागवड करून मिळवा अधिक नफा

Shares

शेतकरी अधिक उत्पन्नासाठी आंतरपीक म्हणून विविध पिकांची लागवड करत असतो. आपण आज एका अश्या दुर्मिळ पिकाची माहिती जाणून घेणार आहोत. हे पीक तुम्हाला अधिकचे उत्पन्न मिळवून देण्यास मदत करेल. हे पीक म्हणजे काळ्या मक्याचे पीक होय.

हे ही वाचा (Read This) Sarkari Naukri 2022: भारत सरकारच्या न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) नोकरीची सुवर्ण संधी, लवकर अर्ज करा

बाराही महिने घेता येते काळ्या मक्याचे पीक

महाराष्ट्रामध्ये मक्याचे पीक अनेक भागांमध्ये घेतले जाते तर त्यातील काही भागांमध्ये तांबड्या आणि पांढऱ्या मक्केचे उत्पादन घेतले जाते. या मक्क्यांच्या पिकांची उन्हाळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते. याचे कणीस भरत असताना पूर्णपणे न भरता ते अर्धवट अवस्थेत भरते. पण या काळ्या मक्केचे कणीस उन्हाळ्यातही पूर्णपणे भरते. त्यामुळे याचे उत्पादन घेणे फायद्याचे ठरते.

हे ही वाचा (Read This) बैलगाडा शर्यतीसाठी नवीन नियमावली जाहीर

तांबड्या आणि पांढऱ्या मक्केच्या उत्पादनाला काही मर्यादा पडत असताना काळी मक्का 12 महिने चांगले उत्पादन देते. या काळ्या मक्केचे उत्पादन तांबड्या आणि काळ्या मक्केपेक्षा 4 ते 5 क्विंटलने जास्त निघते. या मक्केला जास्त प्रमाणात पाणी लागत नाही.

ऊसाच्या आंतरपीकातही चांगल्या प्रकारे उत्पादन घेता येते. उसाला जी रासायनिक खते वापरली जातात. त्यांचाच या मक्केसाठी उपयोग होतो. प्रामुख्याने तांबड्या आणि पांढऱ्या मक्केचे उत्पादन ऊसाच्या शेतात घेतले जाते.

हे ही वाचा (Read This) रिक्रूटमेंट 2022: टपाल विभाग रिक्त जागा भरणार, शिक्षण ८ वी पास , या तारखेपूर्वी करा अर्ज

जनावरांना खाण्यास दिल्यास दुधात होते वाढ

काळी मक्का हे जनावरांच्या खाण्यासाठी अगदी पौष्टिक असते. जनावरांना हा मक्का खाऊ घातल्यास त्यांच्या दुधामध्ये १ ते २ लिटरने वाढ होते. त्यामुळे जर शेतकरी पशुपालन करत असेल तर त्यांनी आंतरपिक म्हणून या पिकाची लागवड करणे फायद्याचे ठरते.

पांढरा तसेच तांबड्या मक्क्याप्रमाणेच काळ्या मक्याचेही पीक घेता येते. या मक्केचा उपयोग हा जनावरांना आहार म्हणून देण्यात येतो. भारतात प्रामुख्याने या पिकाची लागवड उडीसा मध्ये करण्यात येते. तर महाराष्टामध्ये काळ्या मक्याचे पीक हे अगदी दुर्मिळ आहे. त्यामुळे याची लागवड केल्यास मोठ्या प्रमाणात बाजार तसेच नफा मिळेल.

हे ही वाचा (Read This) डाळिंबाच्या उत्पादनात घट, खरीप हंगामात शेतकऱ्यांना होणार फायदा !, कृषी विभागाचा सल्ला जारी

काळ्या मक्याचे बियाणे दुर्मिळ होत चालले

काळ्या मक्याचे बियाणे हे दुर्मिळ होत चालले असून लवकरच याचे नामशेष मिटेल अशी भीती आहे. त्यामुळे यास जिवंत ठेवण्यासाठी या पिकाची लागवड करणे गरजेचे आहे.
प्राचीन काळापासून लोक मक्केची भाकरी वगैरे खात होते. परंतु अलीकडे लोकांचा मक्केकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यामुळे लोक मक्केची भाकरी खात नाहीत. मात्र या मक्याची भाकर बनवून खाल्यास आरोग्यासाठी हे अत्यंत गुणकारी ठरते. यामध्ये मक्केमध्ये कॅल्शियम, मिनरल्स, आयर्न, प्रोटीन भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. तर जनावरांच्या आहारात याचा समावेश केल्यास दुभत्या जनावरांच्या दुधामध्ये १ ते २ लिटरने वाढ होते.

हे ही वाचा (Read This) Summer Special : घामोळ्यांचा त्रास होत असेल तर करा हे उपाय

काळ्या मक्याचे पीक हे हंगामी नसून कोणत्याही हंगामात याची लागवड करता येते

काळ्या मक्केची लागवड उन्हाळ्याच्या हंगामात केली तरीही चांगली येते. या मक्केला चांगल्या प्रतीची दोन कणसे येतात. या मक्केचे उत्पादन साडेचार महिन्यात निघत असून हेक्टरी 50 ते 60 क्विंटल पर्यंत मक्का निघू शकते. काळ्या मक्केचे उत्पादन तांबड्या आणि पांढऱ्या मक्केच्या उत्पादनापेक्षा जास्त निघते. या काळ्या मक्केची लागवड कोणत्याही हंगामात करता येते.काळ्या मक्याचे पीक हे हंगामी नसून कोणत्याही हंगामात याची लागवड करता येते.

हे ही वाचा (Read This राज्यात वीज टंचाई ; भारनियमन अटळ

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *