शेतकरी हा शेतीला व्यवसाय म्हणून पाहतच नाही, हीच बाब अतिशय चिंताजनक आहे – एकदा वाचाच

Shares

नमस्कार मित्रांनो आपला देश शेतीप्रधान आहे.आपली सर्वाची उपजीविका शेतीमधील अन्नधान्या वर अवलंबून आहे. शेती व शेतकरी यांचा विचार करूनच शासन नवीन योजना आखत असते. परंतु आपले काही शेतकरी तर शेतीला व्यवसाय म्हणून पाहतच नाही.आमच्या भागात तर‌ अशी परिस्थिती आहे की शेतकरी हा शेती करताना नाराज असतो.नेहमी कर्जाचा डोंगर असतोच. त्यामुळे बरेच शेतकरी येथे शेती सोडतात तर काही शेती करावी की सोडावी या द्विधा मनस्थितीत असतात आणि हीच बाब अतिशय चिंताजनक आहे व‌ विचार करण्याजोगे आहे.

खरच या गायीच्या जातीचे पालन करून दूध उत्पादनासह बंपर कमाई होते का ? जाणून घ्या

मला असे वाटते की शेती जर नफ्याची करायची असेल तर आपल्या शेतकरी मित्रांनो नाविण्यपूर्ण उपाय करावे लागेल आपल्याला प्रथम शेती करण्याची आवड असली पाहिजे हा पहिला मुद्दा महत्त्वाचा आहे.त्या नंतर शेतीचे काम करताना समाधान व आनंद असला पाहिजे.नाही तर नकारात्मक भूमिका घेऊन असे होत की आपल्या जवळ असलेली शेती च्या बाबतीत ‘लोक काय म्हणतील शेती केली नाही तर’ म्हणून कंटाळून व नाईलाज म्हणून फक्त शेती कडे पाहतात. काही तरुनाचे शेती बाबतीत नकारात्मक धोरण असते.

शेती फायदेशीर नाही येणारा पाऊस वेळेवर पडत नाही व किडी व रोगामुळे पिकाचे नुकसान होते, जंगली जनावरे शेतीचं नुकसान करतात ही भावना व्यक्त करतात.मात्र दुसरी बाजू पाहतच नाही. शेती मधे अडचणी आहेत तसे मार्गही तेवढेच आहे.आता सांगा की काही बीमारी मुळे माणसं मरतात तर म्हणून का लहान बाळाला जन्म द्यायचं कोणी थांबते का?नाही ना मग आपन‌ तर शेतकरी आहे आपन शेती केली तर स्वतःला, कुटुंबाला लागणारं अन्नधान्य मिळेल व आपल्या कुटुंबामार्फत उत्पादनक्षमता निर्माण होईल .

खाद्यतेलाच्या किमतीत मोठी घसरण

शेती हि आवड म्हणून आणि गरज म्हणून करायची मनाची एकदा तयारी झाली की ती फायदेशीर कशी होईल याचा विचार आपोआपच मनात निर्माण होईल. त्याच बरोबर आपल्याला पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालून फायद्याच्या शेतीचं रहस्य जाणून घेता येईल. बाजारात काय विकतंय याचा अंदाज घेऊन शेतात तशी लागवड करेल. शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून तो बघायला लागेल. आपलं जीवनमान उंचावण्यासाठी पैशांची व साधन सुविधांची गरज असते, शेती मधुन पैसे मिळाले की जीवनमान व रहाणीमान सुधारेल व इतर लोकही आदराने आपल्या कडे बघतील व आपलेच अनुकरण ते करतील. जर आपन जे नविन वान शेतात पिकवतोय त्याला बाजारात चांगला भाव आला पाहिजे त्याला बाजारपेठ उपलब्ध करणे साठवणूक साठी योग्य स्थीतीत आपन शेतकरी योजना व सबसिडी अवलंबून असतो माझे असे मत आहे कि आपन याबाबत फार अपेक्षा करूच नये.

पपईवरील काळे डाग शेतकऱ्यांसाठी ठरतेय अडचणीचे, नवीन रोगाची अशी घ्या काळजी

आजकाल आपण स्वतःमध्ये नकारात्मक विचारच निर्माण करतो.एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा की नकारात्मक विचारातून कधीच चांगलं निर्माण होत नाही. आपल्या शेतकऱ्यांना शेती उत्पादना जर योग्य व चांगला भाव मिळाला की आपण जास्त उत्पादन प्रयत्न करु शकतो जो उत्पादन घेईल त्याला फायदा मिळेल जो करणार नाही त्याला फायदा मिळणारच नाही शेती व शेतकरी यांना श्रमाला, कार्यप्रवण वृत्तीला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. प्रामाणिकपणे कष्ट केले की त्याचं फळ मिळतंच आणि पर्यायाने आपला विकास होतो हे ठसठशीतपणे दिसलं पाहिजे. समस्या असली तरीही एवढे सगळे हात सुनियंत्रीत पद्धतीने कामाला लागले तर उत्पादनक्षमता अनेक पटीने वाढेल यात तिळमात्र शंका नाही.

मक्याच्या तीन नवीन जाती विकसित, कमाई,उत्पन्न आणि खाण्यासाठी उत्तम

प्रत्येक जन‌ जमेल तसे शेती मधे योगदान देऊ शकतो. त्यामुळे परीवार मधील एकात्मता वाढते, कष्ट केल्याने तब्बेत चांगली राहते व उगीच कुणाच्या कुरापती ला वेळ नसेल त्यामुळे भांडणतंटे कमी होत जाते. शेतीत सतत नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी माहिती व प्रोत्साहन दिलं पाहिजे शेतकरी काम करून उत्पादन वाढवेल या उद्देशाने धोरणांची आखणी झाली पाहिजे. चांगल्या गोष्टींचं जसं कौतुक केलं पाहिजे तसं वाईट गोष्टीही दाखवून दिल्या पाहिजेत. चांगलं तेच टिकलं पाहिजे व वाढलं पाहिजे असच धोरण राबवलं पाहिजे.

साखर निर्यातीसाठी सरकारने 20 जुलैपर्यंत दिली सूट

आपन शेती कडे सकारात्मकतेने पहायला हवं. शेती हा एक व्यवसाय म्हणून त्याकडे बघितलं आणि अचूक व्यवस्थापनाच्या माध्यमातून हा व्यवसाय केला तर शेती आणि शेतकऱ्यांचं भविष्य उज्ज्वल आहे.तज्ञ व शास्त्रज्ञ मार्गदर्शन करू शकेल. पण प्रयत्न आपणच केले पाहिजेत आपन अंगीकार केला तर येणारा काळ हा नक्कीच शेती साठी फलदायी आणि भरभराटीचा असेल.कारण येणार्या काळात शेतकरी हा च राजा असेल या मधे कुणाचे दूमत नाही…..

धन्यवाद

विचार बदला जिवन बदलेल

मिलिंद जी गोदे.

milindgode111@gmail.com

डील रद्द करण्याच्या एलोन मस्कच्या निर्णयाविरोधात ट्विटर कोर्टात जाणार, जाणून घ्या पुढे काय होऊ शकते
Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *