शेतकऱ्यांना २०२६ पर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार

Shares

सरकार शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असते. शेतकऱ्यांच्या हितासाठी अशीच एक योजना सन २०१५ मध्ये सरकारने राबवली होती. ती योजना म्हणजेच पंतप्रधान ठिबक सिंचन योजना. परंतु या योजनेमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहे. याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. पाण्याचा अपव्यय टाळावा तसेच भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून पंतप्रधान ठिबक सिंचन योजनेमध्ये काही बदल घडवून आणले आहेत.
पंतप्रधान ठिबक सिंचन योजना ही २०१५ मध्ये सुरु करण्यात आली होती. आता मात्र यामध्ये काही बदल करण्यात आले आहे. या योजनेमध्ये २ वर्षाची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे २०२५-२६ पर्यंत या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे. या योजने करीता केंद्र सरकारने ५० हजार कोटी रुपयांची तरतुदी केली आहे. तसेच सिंचनासाठी जर स्प्रिंकलचा वापर केला तर ८० ते ९० टक्के अनुदान शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. स्प्रिंकलर हे कमी उंचीच्या पिकांसाठी देखील प्रभावी ठरते. त्याचबरोबर यामुळे शेतजमिनीचे कोणतेही नुकसान होत नाही.

सरकारने घेतला हा निर्णय –
काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान ठिबक सिंचन योजनेची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता २ वर्षे अधिक म्हणजेच २०२५-२६ पर्यंत शेतकऱ्यांना पंतप्रधान कृषी सिंचन योजनेचा लाभ घेता येणार आहे.

या योजनेसाठी कोण लाभार्थी ठरू शकतं ?
पंतप्रधान ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेतजमीन असणे गरजेचे आहे. या योजनेचा शेतकरी वैयक्तिक बरोबर शेती गट, संस्था,शेती उत्पादक कंपन्यांचे सदस्य यांनादेखील लाभ घेता येणार आहे. गेल्या ७ वर्षांपासून भाडेपट्टी करारांतर्गत शेती करत आहेत त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कसा करावा अर्ज ?
१. सर्वप्रथम अर्ज करण्यापूर्वी महाडीबीपी ऑनलाईन पोर्टल ओपन करावे लागेल.
२. यानंतर मुखपृष्ठावर अर्ज करा असा टॅग असेल त्यावर क्लिक करावे.
३. नंतर सिंचन साधने सुविधा यावर क्लिक करून बाबी निवड पर्याय ओपन करावा.
४. त्यांनतर तिथे विचारलेली वैयक्तिक माहिती भरावीत.
५. त्यानंतर मुख्य घटक मधील सिंचन साधने आणि सुविधा यावर क्लिक करायचे आहे.
६. त्यानंतर तिथे विचारलेली माहिती भरून अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करावे.
७. त्यांनतर योजनेचे नाव , तालुका समोर दिसेल त्याच्या खाली अटी मान्यतेवर क्लिक करावे.
८. अशी पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर आपल्या अकाउंट मधून २३ रुएए ६० पैसे भरावे लागतात.

वरील दिल्याप्रमाणे अर्ज करून या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *