वाढत्या तापमानामुळे पशुपालक अडचणीत, दूध उत्पन्नात घट

Shares

यंदा एप्रिल महिन्यामध्येच तापमान वाढतांना दिसत आहे. याचा परिणाम जनावरांवर होतांना दिसत आहे. तसेच पिण्याचे पाणी आणि हिरवा चारा यांचा तुटवडा असल्यामुळे पशुपालक संकटात आल्याचे दिसत आहे.

हे ही वाचा (Read This) केळीच्या फांद्यापासून सेंद्रिय खत बनवून नफा कमवू शकतात शेतकरी

वाढत्या तापमानामुळे जनावरांची लाहीलाही होत आहे. तसेच याचा परिणाम दुग्ध जनावरांवर होतांना दिसत आहे. तसेच जनावरांच्या आरोग्यावर तसेच दूध उत्पादनावर, प्रजोत्पादनावर विपरीत परिणाम होतांना दिसत आहे. त्यात संकरित व विदेशी गायी उष्णतेला लवकर बळी पडतात.

ही वाचा (Read This) भविष्याच्या दृष्टीने गटशेती महत्वाची…!
संकरित व विदेशी रक्तगट असणाऱ्या गाईसाठी २४ ते २६ अंश सेल्सिअस तापमान, देशी गाई साठी ३३ अंश सेल्सिअस तापमान तर म्हशीसाठी ३६ अंश सेल्सिअस तापमान ही उष्णता सहन करण्याची उच्च पातळी तापमान आहे. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते.

हे ही वाचा (Read This)   या पिकाची लागवड करून बाराही महिने कमवा लाखों रुपये

अशी घ्या काळजी

वाढत्या ऊन्हामुळे शरिराचे तापमान वाढते ते सामान्य ठेवण्यासाठी पाण्याची गरज असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरांना चार ते पाच वेळा पाणी पाजावे. शक्य असल्यास दुभत्या जनावरांच्या अंगावर दिवसातून दोन वेळा पाणी टाकावे. पाणी पिण्याची जागा सावलीत व जनावरांच्या जवळ असावी. गोठ्यातील तापमान १५ ते २५ अंश सेल्सिअस राखण्याचा प्रयत्न करावा.

हे ही वाचा (Read This)  शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी,अखेर शेतीमध्ये ड्रोनच्या वापराला हिरवा कंदील

गोठा व परिसर थंड राहील याची काळजी घ्यावी. शेतकऱ्यांना जर अशा काळातही दूध उत्पादन चांगले घ्यावयाचे असल्यास जनावरांच्या व्यवस्थापनात वातावरणानुसार आवश्यक बदल करणे महत्वाचे असते. पशुपालकांनी जनावरांच्या आहारात शक्य होईल तितका हिरवा चाऱ्याचा समावेश करावा हा जनावरांचा चारा सकाळ-संध्याकाळ जनावरांना द्यावा.

टीप – उष्णतेमुळे जनावर आजारी पडल्यास पशुचिकित्साकाचा सल्ला घेणेही गरजेचे आहे.

हे वाचा : एसटी कर्मचारी कामावर परतण्यास सुरवात

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *