डाळिंबातील मर रोगाचे नियंत्रण

Shares

सध्या डाळिंब उत्पादक पट्ट्यात बागांमध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव दिसतो आहे. बागायतदारांनी सामुदायिक पद्धतीने एकात्मिक रोग नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.

तोष सूत्रकृमी, खोड किडा, फ्युजॅरियम, रायझोक्‍टोनिया, सिरॅटोसिस्टीस बुरशीचा प्रादुर्भाव तसेच अति पाणी दिल्याने मर रोगाचा प्रादुर्भाव वाढतो आहे.

लक्षणे

1) शेंड्याची पाने पिवळी पडून फांद्या वाळतात.
2) खोडातील गाभा पडतो.
3) खोडाच्या खालच्या बाजूला बुरशीची वाढ होते.

मधुमेह : पांढऱ्या बेरीमध्ये दडला आहे आरोग्याचा खजिना, रक्तातील साखर फटाक्यांपेक्षा कमी होईल, जाणून घ्या कसे सेवन करावे

नियंत्रणाचे उपाय

रोगाचा प्रादुर्भाव झालेली बाग – मर रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या बागेत हेक्‍झाकोनॅझोल 15 मि.लि. किंवा प्रोपीकोनॅझोल 15 मि.लि.किंवा कार्बेन्डेन्झिम 20 ग्रॅम यापैकी कोणतेही एक आणि त्यामध्ये क्‍लोरपायरिफॉस 25 मि.लि. दहा लिटर पाण्यात द्रावण तयार करावे. यातील पाच लिटर द्रावण प्रति झाडाच्या आळ्यात खड्डा रिंग पद्धतीने ओतावे.

संपूर्ण झाडावर हेक्‍झाकोनॅझोल 10 मि.लि. किंवा कार्बेन्डान्झिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

शेतकऱ्यांसाठी सर्वोत्कृष्ट ट्रॅक्टर: 50HP विभागातील हा सर्वात स्वस्त ट्रॅक्टर आहे! बचतच शेतकऱ्यांना मदत करेल

वाळलेले झाड उपटून नष्ट करावे.

झाडाच्या छाटलेल्या भागांना 10टक्के बोडोपेस्ट (1 किलो मोरचूद + 1 किलो चुना + 10 लिटर पाणी) लावावी.

खोडकिडीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना

1) गेरू पेस्ट – 10 लिटर पाण्यात गेरू 4 किलो + क्‍लोरपायरीफॉस 50 मि.लि.+ कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड 25 ग्रॅम मिसळून खोडास दोन फुटापर्यंत दुसऱ्या वर्षापासून लावावी.

2) इंजेक्‍शनद्वारा डायक्‍लोरव्हास 10 मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून छिद्रांमध्ये सोडावे. छिद्रे बंद करावीत.

तण तुमच्या शेतातील 20 टक्के पोषक द्रव्ये खातात, त्यांचे नियंत्रण कसे करायचे ते जाणून घ्या

सूत्रकृमी नियंत्रण

1) फोरेट 20 किलो प्रति हेक्‍टरी जमिनीत मिसळून द्यावे.

2) आंतरपीक म्हणून झेंडू लागवड करावी किंवा उन्हाळ्यात ड्रिपरजवळ झेंडू रोपांची लागवड करावी.

नवीन लागवड करतानाच्या उपाययोजना

हलकी ते मध्यम प्रतीची जमीन लागवडीसाठी निवडावी.
लागवडीपूर्वी खड्डे उन्हात तापून द्यावेत.
रोगविरहित रोपे लागवडीसाठी वापरावी.

मक्याचा भाव: खरीप मका या वर्षी MSP पेक्षा जास्त दराने विकला जाऊ शकतो, किंमत 2300 अपेक्षित आहे, अहवाल वाचा

4.5 मीटर बाय 3 मीटर अंतरावर 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर आकाराचे खड्डे घ्यावेत.

पाच लिटर पाण्यात 10 ग्रॅम कार्बेन्डाझिम मिसळून प्रत्येक खड्ड्यात शिंपडावे.

क्‍लोरपायरीफॉस 50 मि.लि.प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून प्रत्येक खड्डात शिंपडावे.

कॅल्शियम हायपोक्‍लोराइट 100 ग्रॅम प्रति खड्डात धुरळावे.

शेणखत 20 किलो, गांडूळखत 2 किलो, निंबोळी पेंड 3 किलो, ट्रायकोडर्मा प्लस 25 ग्रॅम, ऍझोटोबॅक्‍टर 15 ग्रॅम, पीएसी 15 ग्रॅम या मिश्रणाने खड्डे भरावेत.
गरजेनुसार पाणी द्यावे.

पीएम-किसान: नोंदणी करूनही पीएम किसान योजनेचे पैसे न मिळाल्यास काय करावे?

KCC ची पात्रता: किसान क्रेडिट कार्ड कोण घेऊ शकते हे जाणून घ्या, RBI नियम काय सांगतो?

मधुमेह: आहारात वॉटर ऍपलचा समावेश करा, रक्तातील साखर लगेच कमी होईल, तुम्हाला अनेक फायदे होतील

एल निनोबद्दल वाईट बातमी : मान्सून-एल निनोवर आला हा मोठा अहवाल, शेतीशी संबंधित शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक वाचा

जिऱ्याच्या भावात मोठी झेप, भावाने ५८ हजारांचा टप्पा पार केला, पेरणीचे क्षेत्रही दुप्पट होण्याची शक्यता

दुकानदार किंवा कंपनी कडून गडबड झाल्यास, ग्राहक न्यायालयात अशी ऑनलाइन तक्रार करू शकतात

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *