तुमच्या पशुसाठी हे गवत चाऱ्यासाठी आहे उत्तम !

Shares

शेतकरी शेतीबरोबर जोडधंदा म्हणून पशुपालन करतो. पशूंपासून जास्त उत्पन्न मिळवायचे असेल तर त्यांच्या आहाराची चांगली काळजी घेतली गेली पाहिजे. त्यासाठी बाजारात चारा उपलब्ध असतो किंवा तुम्ही चारा म्हणून उपयोग होणाऱ्या गवताची लागवड करू शकता. तुम्ही पशुपालन करत असाल तर त्यांच्यासाठी याचा उपयोग होईल अन्यथा तुम्ही हा चारा बाजारात जाऊन विकून त्यातून नफा मिळवू शकता. आपण आज चारा म्हणून वापरण्यात येणाऱ्या गवतांची माहिती जाणून घेणार आहोत.

कुसळी गवत –
१. या गवताचे २ प्रकार आहेत. पहिले वर्षायू गवत जे आकाराने लहान असून हलक्या ते साधारण जमिनीवर वाढते. दुसरे बहुवर्षायू जे आकाराने मोठे असून मध्यम ते चांगल्या जमिनीवर वाढते.
२. साधरणतः हे गवत ५०० ते १५०० मी. मी. पावसाळी प्रदेशात आढळते.
३. हे गवत निमकोरड्या परदेशात आढळून येत नाही.
४. गाळमिश्रित जमिनीत या पिकाची वाढ चांगली होते.
५. या गवताच्या मुळाशी नत्र जमा होण्याची क्रिया जलद होते.
६. जमिनीत क्षाराचे प्रमाण जास्त असल्यात ह्या गवताची वाढ होत नाही.
७. या गवतासाठी जमिनीचा सामू ५ ते ६ असावा लागतो.
८. या गवताचा वैरण व मुरघास तयार कारण्यासाठी वापर केला जातो.
९. उन्हाळ्यात गुरांना चारा म्हणून हे गवत उत्तम ठरते.

अंजन, धामण –
१. या गवताचे पीक नदीकाठच्या वाळूयुक्त जमिनीत उत्तम येते.
२. हे पीक गुजरात , खानदेशात जास्त प्रमाणात दिसून येते.
३. दुभत्या जनावरांसाठी चारा म्हणून हे गवत उत्तम ठरते.

दांड , डोंगरी गवत –
१. हे गवत अतिवृष्टी तसेच अल्पवृष्टीच्या प्रदेशात आढळून येते.
२. याची बेटे शेताच्या बांध्यावर तसेच डोंगर उतारावर तयार होतात.
३. हा चारा बैलांना दिला जातो.
४. या गवतास फुले येण्याअगोदर चारा म्हणून वापर करतात.

लाल, तांबरूट गवत –
१. हे गवत कोरड्या तसेच निमकोरड्या प्रदेशात आढळून येते.
२. हे वर्षायू गवत असून आकाराने लहान असतात.
३. हे गवत काळ्या, मध्यम काळ्या जमिनीवर जास्त प्रमाणात दिसून येते.
४. हिरवे व वाळलेले गवत गुरे खात असले तरी सर्वाधिक हिरवे गवत खातात.

मारवेल गवत –
१. भारतातील सुप्रसिद्ध गवतांपैकी गवत म्हणजे मारवेल गवत होय.
२. हे बहुवर्षायू गवत डोंगराळ भागात आढळून येते.
३. हे गवत चरण्याचे प्रमाण जास्त असल्यास हे गवत आडवे वाढते.
४. या गवताची पाने लांब ,अरुंद , निळसर हिरव्या रंगाची असतात.
५. गाई-गुरे, म्हशी ,घोडे जास्त प्रमाणात हा चारा खातात.
६. या गवतापासून मुरघास तयार करता येते. या ओल्या गवतात ६६% पाणी, २.२% प्रथिने, ३.७% खनिजे उपलब्ध असतात.
७. हे गवत ३० सेमी पर्यंत उंच वाढते.
८. भारताबरोबर आफ्रिका, सुदान, ऑस्ट्रेलिया येथे हे गवत आढळते.
९. कुरणासाठी हे उत्तम गवत मानले जाते.

मुसेल , मोशी गवत –
१. हे गवत बहुवार्षिक असून १५ ते ५० सेमी उंच वाढते.
२. मध्यम ते मऊ बारीक कण असणारी गाळाची माती या गवतास उत्तम ठरते.
३. हे गवत सर्व उत्तम गवतांपैकी एक आहे.
४. हे गवत बाजारात मोठ्या संख्येने विक्रीस उपलब्ध असते. या गवतास भाव देखील चांगला मिळतो.
५. या गवताची एकदा लागवड केल्यानंतर ३ ते ४ वर्षापर्यंत याची कापणी करता येते.
६. राजस्थान येथे या गवतावर मेंढ्या पोसल्या जातात.
७. कोरड्या तसेच निमकोरड्या प्रदेशात या गवतास मोलाचे गवत समजले जाते.

हरळी, दुर्वा गवत –
१. हे गवत सर्वत्र आढळून येते तसेच याची उंची ९० सेमी पर्यंत वाढते.
२. हे गवत अतिशय गोड व पौष्टिक असे असते.
३. मुरघास बनवण्यासाठी या गवताचा वापर केला जातो.
४. म्हशी, बदके, हंस, गुरे, शेळ्या -मेंढ्या यांना चरण्यासाठी हे गवत उत्तम समजले जाते.
५. हे गवत एकदा लावल्यानंतर किमान ३ वर्षापर्यंत याची कापणी करता येते.

पशुपालन करत असाल तर गवताचे पीक घेणे फायदेशीर ठरतेच त्याच बरोबर बाजारात विक्री करण्यास देखील गवत शेती फायदेशीर ठरते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *