उसाच्या शेतात गांजा पीक लागवड, गांजा पिकाची उंची वाढल्याने भिंग फुटले

Shares

शेती व्यवसायामध्ये मुबलक प्रमाणात नफा मिळत नसल्यामुळे शेतकरी काही ना काही नवनवीन उपाय करत आहेत. मात्र बीड जिल्ह्यात अधिक नफा मिळावा यासाठी गांज्याची शेती केली जात आहे. काही दिवसांपूर्वी परळी तालुक्यात गांज्याची शेती करतांना काहींना अटक करण्यात आली होती. आता तलवाडा येथे असाच एक प्रकार उघडीस आला आहे.

हे ही वाचा (Read This) ब्राह्मी या औषधी पिकाची लागवड करून मिळवा अधिकचा नफा

उसाच्या शेतामध्ये गांजा शेती करत असल्याचे कळताच पोलीस उपाधीक्षक यांनी शेतामध्ये त्वरित छापा टाकला. २२ किलो गांज्याची झाडे ही ताब्यात घेण्यात आली असून मालकास अटक करण्यात आली आहे. एवढ्या दिवस लगतही ऊस असल्याने ही बाब निदर्शनास आली नाही पण आता उसतोड होताच हा प्रकार समोर आला आहे.

ऊस पिकापेक्षा गांजा पिकाची वाढ जास्त

ऊस पिकामध्ये गांजा लावला आहे हे लक्षात येत नाही म्हणून शेतकरी हा मार्ग अवलंबतात. उसतोड सुरु असून शिवार रिकामा होत आहे. अशातच तलवाडा येथील बाळू खवाटे यांच्या शेतामध्ये उसापेक्षा गांजालाच अधिकची वाढ होती.
गांजाची झाडे ही 5 ते 6 फुटावर गेली होती. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी खवाटे यांच्या शेतात छापा मारुन गांजाची झाडे ताब्यात घेण्यात आली आहे.

हे ही वाचा (Read This) या पिकाची लागवड करा ३ वर्षे नो टेन्शन, मिळवा ६ लाखांपर्यंतचे उत्पन्न

गांजा शेती प्रकारात वाढ

कोरोना काळामध्ये शेतकऱयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांनतर अवकाळी तसेच अतिवृष्टी यामुळे शेतकरी संकटात सापडला होता. अश्यात कमी काळात अधिक उत्पन्न मिळवण्याच्या भावनेमुळे शेतकरी गांजा शेती करत असल्याचे निदर्शनात आले आहे. तर गांजा शेतीचे प्रकारात वाढ होतांना दिसत आहे.

हेही वाचा :बँकेच्या वेळा बदलल्या, RBI चा मोठा निर्णय

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *