बाजारपेठेत मोठा बदल, सोयाबीनच्या दरात वाढ !
गेल्या काही महिन्यापासून सोयाबीनच्या (Soybean) दराची चर्चा सुरु असून त्याच्या दरात मागील काही दिवसापासून स्थिरता आहे. शेतकऱ्यांनी अनेक दिवसापासून सोयाबीनची साठवणूक केली होती. आता मात्र नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी (Farmers) सोयाबीनची विक्री करत आहेत. मागील काही दिवसापासून सोयाबीनला ६ हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे भाव होता. आता मात्र हा दर वाढून ६ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल झाला आहे.
मध्यंतरी सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) घसरण होत होती त्यामुळे शेतकरी चिंतेत होता तर अनेक शेतकऱ्यांनी अधिकचे नुकसान टाळण्यासाठी सोयाबीन मिळेल त्या भावात विक्री करण्यास सुरुवात केली होती. आता मात्र सोयाबीनच्या भावात वाढ झाल्यामुळे चित्र थोडे बदलतांना दिसत आहे.
हे ही वाचा (Read This ) शेतकरी मित्रांनो, SHCS या योजनेचा आपण लाभ घेतला आहे का ?
सोयाबीनला मिळाला दीड महिन्यातील सर्वोच्च दर
सोयाबीनच्या सतत बदलत्या दराची चर्चा सर्वत्र रंगली होती. त्यात सोयाबीनच्या उत्पादनात घट होऊन देखील त्याचे दर वाढत नव्हते. उत्पादन कमी झाले तर दरात वाढ होते असा बाजाराचा नियम आहे. मात्र यंदा सगळे उलटे झाले आहे. मागील दीड महिन्यापासून सोयाबीनला ६ हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे दर होता. आता मात्र या दरात वाढ होऊन ६ हजार ४०० रुपये झाला आहे.
हे ही वाचा (Read This ) आता सातबारा उतारा बंद? राज्य सरकारचा निर्णय
अजूनही अनेक शेतकऱ्यांना शंका ..
फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाल्यापासून सोयाबीनच्या दरात वाढ होतांना दिसून येत आहे. मात्र सोयाबीनचे दर आता पुन्हा स्थिर राहतील की अजून सुधारतील अशी शंका शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे सध्याचे थोडे वाढलेले भाव पाहता अनेक शेतकऱ्यांनी साठवलेला सोयाबीन विक्रीस काढला आहे. तर अनेक ठिकाणी दर वाढून देखील आवक मात्र तेवढीच आहे. अनेकांना सोयाबीनच्या दरात अधिक वाढ होईल अशी अपेक्षा आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या दर वाढीची आम्ही वाट बघत असून दरवाढ झाल्याशिवाय आम्ही विक्रीस काढणार नाही असे सांगितले आहे.
हे ही वाचा (Read This ) रासायनिक, जैविक, सेंद्रिय, शेतीचे अनेक प्रयोग ऐकले पण आता होमिओपॅथिक शेती