भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

Shares

फळ बागायतीचे क्षेत्रात अधिक वाढत चालली आहे. फळ बागायतीला आधुनिकतेची जोडही दिली जात आहे. परीणामी उत्पादनातही वाढ होत आहे.फळबागाकडे शेतकऱ्यांनी वळावे यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे.शेतकऱ्यांनी फुल, फळबागाचे क्षेत्र वाढावावे यासाठी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसेही आग्रही आहेत.फळबाग लागवड करणाऱ्यासाठी सरकार आर्थिक मदत करत आहे. यासाठी एक योजनाही राबवली जात आहे. ही योजना म्हणजेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना. ही योजना १९९० पासून लागू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत जे लाभार्थी फळबाग लागवड बाबीचा लाभ घेऊ शकत नाही त्यांना लाभ देण्यात येणार आहे.अल्प, अत्यल्प भूधारक, महिला आणि दिव्यांग शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य दिले गेलेलेआहे.

योजनेसाठी पात्रता –

१. शेतकऱ्यांची कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर चालू मन असेल अशांना प्रथम प्राधान्य त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचा विचार करण्यात येईल.

२. शेतकऱ्याच्या नावे स्वतःचा सातबारा असणे आवश्यक .

३. जर सातबारा उताऱ्यावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी संमतीपत्र आवश्यक.

४. जर सातबाऱ्यावर कुळाचे नाव असेल तर कुळाचे संमतीपत्र आवश्यक.

क्षेत्र मर्यादा –

१. मिळताना पहिल्या वर्षी ५० टक्के, दुसऱ्या वर्षी ३० टक्के, तिसऱ्या वर्षी २० टक्के याप्रमाणे अनुदान देय राहील. दरम्यान या योजनेसाठी अर्ज तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे करावा.

२. किमान ०.२० हे. व कमाल ६.०० हेक्टर पर्यंत लाभ घेता येईल३. या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारचे शंभर टक्के अनुदान आहे. मिळणारे अनुदान हे तीन वर्षाच्या कालावधीत मिळणार.

लागवड कालावधी –

१. फळबाग लागवडीसाठी शेतकरी यांना कृषी विद्यापीठ रोपवाटिका, राष्ट्रीय बागवानी मंडळ मार्फत मानांकित खाजगी रोपवाटिका तसेच कृषी विभागाच्या परवानाधारक रोपवाटिकेतून कलम रोपे खरेदी करता येतील.

२. शेतकऱ्यांनी त्यांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर फळबाग लागवड करावी.

३. या योजने अंतर्गत फळबाग लागवड कालावधी हा जून ते मार्च आहे. या योजनेनुसार शेतकरी त्यांच्या आवश्यकतेनुसार सर्व फळपिकांच्या कलमा रोपांची लागवड करता येईल.

प्रति हेक्‍टरी लागवड अंतर व मिळणारे अनुदान –

१. सिताफळ कलम(५ बाइ ५ मी. ) = ७२ हजार ७९८ रुपये

२. चिकू कलमे= ५५ हजार ३५५ रुपये.

३. आंबा कलम(१० बाय १० मी. ) = ५३ हजार ९०० रुपये

४. पेरू कलमे(६ बाइ ६ मी. ) = ६२ हजार ४७२ रुपये

५. संत्रा मोसंबी व कागदी लिंबू कलम(६ बाइ ६ मी. ) = ६२ हजार ५७८ रुपये.

तुम्ही जर फळ बागायतीची शेती करत असाल तर भाऊसाहेब फुंडकर योजने चा आवर्जून लाभ घ्या.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *