भरगोस उत्पन्नासाठी कलिंगड लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान

Shares

कोणतेही पीक लागवड करण्यापूर्वी जमिनीची पूर्वमशागत करणे आवश्यक असते. जास्त , उत्तम उत्पादनासाठी जमिनीची पूर्व मशागत करणे गरजेचे ठरते. आज आपण कलिंगड पिकाच्या लागवडीसाठी जमिनीची पूर्वमशागत कशी करावी? पाण्याचे व्यवस्थापन कसे करावेत ? याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पूर्वमशागत –
१. सुरवातीला जमीन भुसभुशीत करून घ्यावीत.
२. ट्रॅक्टरच्या साहाय्याने २ मीटर अंतरावर सऱ्या सोड्याव्यात.
३. सरीच्या एका बाजूस ६० किंवा ९० सेमी अंतरावर ओंजळभर उत्तम असे कुजलेले शेणखत आणि ट्रायकोडर्मा १० ग्रॅम , थोडेसे फोरेट मिसळून या मिश्रणाचा ढीग टाकावा.
४. टाकलेल्या ढिगाच्या ठिकाणी आळ्याचा आकार द्यावा.
५. लागवडीच्या वेळी खत दिल्यानंतर १५ ते २० दिवसांनी पुन्हा १० १५ ग्रॅम युरिया , १५ ते २० ग्रॅम सुफला , ३ मिली बोरॉन, ३ मिली कॅल्शिअम , ३ मिली मोलिनम, १ लिटर पाण्यातून फवारणी करावी.
६. दुसऱ्या दिवशी एकरी ७५० ते ८०० लिटर ग्रॅम बुटाक्लोर ते तणनाशक १०० लिटर पाण्यात मिसळून द्यावेत.
७. तण उगवले असल्यास खुरपणी करावी.
८. महिनात्यांनी वेलीचे शेंडे खुडावेत.
९. फळाखाली पाचट अंतरावेत.
१०. वेलीचा ओल्याव्याशी संपर्क येऊ देऊ नये.

पाणी व्यवस्थापन –
१. कलिंगड पिकास भरपूर पाण्याची नियमित आवश्यकता असते.
२. अनियमित पाणी पुरवठा झाल्यास फळे तडकून त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.
३. मध्यम प्रकारच्या जमिनीस ५ ते ६ दिवसांनी पाणी द्यावे.
४. कोकणातील जांभ्या दगडाच्या जमिनीस २ ते ५ दिवसांनी पाणी द्यावे.
५. पाणी देतांना फळांचा पाण्याशी संबंध येणार नाही काळजी घ्यावी अन्यथा फळे कुजतात.
६. फळ वाढीच्या काळात वेलींना पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी.

अश्याप्रकारे कलिंगड लागवड करतांना जमिनीची पूर्वमशागत करून योग्य पाणी व्यवस्थापन केल्यास कलिंगडाचे उत्पादन उत्तम व जास्त प्रमाणात होण्यास मदत होते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *