बहुगुणी कोरफड चे फायदे
कोरफड ही बहुवार्षिक वनस्पती असून कोरफड ला आयुर्वेदात खूप महत्व आहे. कोरफड चे मूळ उगमस्थान भारत आणि आफ्रिका आहे. कोरफड मध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. कोरफड ची पाने लांब व जाड मांसल असतात.पानांची रुंदी ५ ते ६ सेंटिमीटर तर लांबी ४५ ते ६० सेंटिमीटर असते.त्यांच्या पानांना काटे असतात. कोरफड अनेक आजारांवर उपयुक्त अशी आहे. कोरफडीमध्ये अॅंटीबॅक्टेरियल, अॅंटीफंगल आणि अॅंटीमायक्रोबल गुणधर्म आढळतात. तर आपण जाणून घेऊयात कोरफडीच्या फायद्या बद्दल.
कोरफडचे फायदे –
१. सौंदर्यवृद्धी साठी कोरफड चा मोठ्या संख्येने वापर होतो.
२. भाजले असेल तर तिथे कोरफडीचा गर लावल्यास थंड वाटते.
३. डोळ्यांच्या विकारावर कोरफड उपयोगी ठरते.
४. पोटदुखी, अपचन,पित्त विकार यांच्या निदनासाठी कोरफडीचा गर अत्यंत उत्तम उपाय आहे.
५. कोरफड चे तेल केसात कोंडा झाला असेल , केस काळे व चकाकी करायचे असेल तर उपयोगी ठरते.
६. त्वचा कोरडी पडत असेल तर त्वचेवर कोरफड लावावी.
७. रोज सकाळी कोरफडीचा एक चमचा गर पिल्याने स्त्रियांची मासिक पाळी नियमित येण्यास मदत होते.
८. कोरफड च्या गरचा उपयोग लोशन म्हणून देखील करता येतो.
९. यकृताची कार्यक्षमता चांगली राहण्यासाठी कोरफड उत्तम औषध आहे.
१०. कोरफड ची चकती बनवून बंद पाळण्यावर ठेवल्यास डोळ्यास थंड वाटते.
११. मधुमेहाच्या रोग्यांनी दररोज कोरफड च्या रसचे सेवन केले तर त्यांचा मधुमेह आटोक्यात राहण्यास मदत होते.
अशी ही बहुगुणी कोरफड चे तुम्ही रोज सेवन केले तर तुम्हाला नक्की याचा फायदा होईल.