७२ तासांच्या आत करा पीकविमा

Shares

मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि शेतकऱ्यांची चिंता वाढली !
मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक नद्या , ओढे तुडुंब भरून पात्राच्या बाहेरपर्यंत उसळून वाहत आहे. त्याचबरोबर सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, मका या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांनी थोडा धीर धरून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ ७२ तासाच्या आत कंपनीकडे पिकविमा नुकसान भरपाई द्यावी असे म्हणून रितसर तक्रार दाखल करावी. कारण पीकविमा नियमानुसार ७२ तासाच्या आता दाखल केलेल्या दाव्यांचाच विचार केला जातो.

पुढीलपैकी कोणत्याही एका पर्यायाद्वारे पीकविमा कंपनी कडे रीतसर तक्रार नोंदवता येते
1 – Bajaj Allianz GIC Ltd टोल फ्री क्रमांक
1800-209-5959
2- PMFBY central govt kisan
टोल फ्री क्रमांक
1800-180-1551
3 – खालील लिंक वापरून फार्म मित्र ऍप डाऊनलोड करून-
http://bit.ly/312ekvl
4 – केंद्र शासनाचे PMFBY crop insurance अँप डाउनलोड करून –
https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central

विशेष म्हणजे तात्काळ तक्रार करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे आॅनलाईन सुविधा उपलब्ध नसेल त्यांनी आॅफलाईन तक्रार दाखल करावी . तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात रितसर तक्रार दाखल केल्यानंतर त्याची पोच पावती घ्यायला विसरू नये.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *