इतर बातम्या

शेतजमिनीला मिळणार १४ अंकी आधार क्रमांक

Shares

सरकारने शेतजमिनीला एक युनिक नोंदणी क्रमांक देण्याची तयारी सुरु केलीय असून २०२३ पर्यंत जमिनीचे डिजिटल रेकॉर्ड तयार होतील असे सांगण्यात आले आहे. हा नोंदणी क्रमांक १४ अंकांचा असणार आहे. २०२२ च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी डिजिटलायझेशनास प्रोत्साहन देण्यासाठी काही घोषणा केल्या असून त्यातील ही एक घोषणा आहे.

हे ही वाचा (Read This ) महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना २०२२, मिळणार ५ हजार प्रतिमहा

ड्रोनने करणार जमिनीचे मोजमाप
सरकारने हा कार्यक्रम राबवण्यासाठी काही निर्णय घेतले आहेत. या नोंदणी कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकार ड्रोनच्या मदतीने जमिनीचे मोजमाप करणार आहे. ड्रोनमधून जमिनीच्या मोजमपात कोणती चूक किंवा गडबड़ होण्याची शक्यता राहणार नाही. त्यानंतर ते मोजमाप सरकारी डिजिटल पोर्टलवर उपलब्ध करून दिले जाणार आहे.

हे ही वाचा (Read This )  या ९० दिवसीय पिकाची लागवड करून मिळवा लाखोंचे उत्पन्न

जमीन खरेदी करणे होईल सोपे ?
यू आर एन सह कोणतीही व्यक्ती त्याच्या जमिनीचे संपूर्ण डिटेल्स आणि कागदपत्रे सहजपणे पाहू शकले, त्यामुळे सर्वसामान्यांना कागदपत्रे मिळवण्यासाठी तहसीलच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. तर जमीन खरेदी विक्रीत ही पारदर्शकता होईल प्रधानमंत्री किसान सन्मान निधी सारख्या अनेक योजनांमध्ये जमिनीची माहिती द्यावी लागले आणि जमिनीशी संबंधित कागदपत्रे अपलोड करावे लागणार आहे.

हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळणार, असा करा अर्ज

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *