केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA १३% वाढणार, तीन महिन्यांची थकबाकीसुद्धा मिळणार?
५व्या आणि ६व्या वेतन आयोगांतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातही सरकार वाढ करू शकते
अलीकडेच मोदी सरकारने सातव्या वेतन आयोगांतर्गत महागाई भत्ता (DA) वाढवला होता. आता सरकार पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगांतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ करू शकते. या कर्मचाऱ्यांचा डीए १३ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.
हे ही वाचा (Read This) आता नोकरी १२ तासांची, पगार पण कमी, पीएफ वाढणार- १ जुलैपासून मोदी सरकार लागू करणार नवे नियम ?
कर्मचाऱ्यांचा १३% DA
वित्त मंत्रालयाच्या विभागानुसार, ६ व्या वेतन आयोगांतर्गत पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांचा डीए सध्याच्या ३६८ टक्क्यांवरून ३८१ टक्के करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 6व्या वेतन आयोगांतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा डीए देखील १९६ टक्क्यांवरून २०३ टक्के करण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांचा डीए ७ टक्क्यांनी वाढणार आहे. हा वाढीव डीए जानेवारी २०२२ पासून लागू असल्याचे मानले जाईल. म्हणजेच जानेवारी ते मार्चपर्यंतची थकबाकी कर्मचाऱ्यांना पगारात दिली जाणार आहे.
हे ही वाचा (Read This) शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी,अखेर शेतीमध्ये ड्रोनच्या वापराला हिरवा कंदील
या कर्मचाऱ्यांचा डीए वाढणार आहे
मोदी सरकार या वाढीव डीएचा लाभ केंद्रीय स्वायत्त संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देणार आहे
काही कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळत नाही
केंद्रीय स्वायत्त संस्थांमध्ये काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा अद्याप सातव्या वेतन आयोगाच्या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. अशा परिस्थितीत त्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळत नाही. ७व्या वेतन आयोगांतर्गत DA वाढवला जातो तेव्हा त्याचा लाभ मिळत नाही. यामुळेच सरकार ५व्या आणि ६व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार डीए ७ वरून १३ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते.
हे वाचा : एसटी कर्मचारी कामावर परतण्यास सुरवात