सोयाबीन आणि तुरीच्या दरात दिलासादायक वाढ !
बदलते वातावरण अतिवृष्टी, अवकाळीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून उत्पादनात घट झाली होती. त्यानंतर शेतमालाच्या दरात कधी चढ उत्तर तर कधी स्थिरता बघायला भेटली होती. त्यात सर्वात जास्त चर्चा सोयाबीनची होत होती. सोयाबीनबरोबर तुरीच्या दरात देखील वाढ होतांना दिसून येत आहे. या दोन्हीसाठी लातूर बाजारपेठ ही महत्वाची आहे. या परिसरात तेल प्रक्रिया उद्योग तसेच डाळ मिलची संख्या जास्त प्रमाणात आहे. उत्पादनात घट होऊनदेखील यांच्या दरात वाढ होतांना दिसून येत आहे. मध्यंतरी ६ हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे दर होता आता ६ हजार १०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.
ही वाचा (Read This) हापूस आंब्याची बाजारात जोरदार एन्ट्री, ८ हजार १०० रुपये डझन
मागील चार दिवसांपासून सोयाबीनच्या दरात २५० ते ३०० रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून सोयाबीनचे दर हे स्थिरावलेले होते. आता कुठे त्यामध्ये वाढ होत आहे. तर दुसरीकडे तुरीच्या दरातही वाढ होत आहे. नव्याने दाखल होत असलेल्या तुरीला ६ हजार १०० रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाली तरी आता वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. लातूर बाजार समितीमध्ये गुरुवारी २२ हजार पोते आवक झाली असून यास ६ हजार ३५० रुपये दर मिळाला आहे.
ही वाचा (Read This) कांद्याची आवक वाढूनही दर स्थिरावले
खुल्या बाजारापेठेत तूर विक्री करण्याला जास्त पसंती …
१ जानेवारी पासून राज्यात १८६ तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात आले असले तरी शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात तुरीची विक्री करण्याचे ठरवले आहे. याचे कारण म्हणजे केंद्र सुरु झाल्यापासून खुल्या बाजारात तुरीचे दर हे ४०० रुपायांनीं वाढले असले तरी केंद्रावर तूर विक्रीसाठी काही अटी नियमांचे पालन करावे लागते तसेच खरेदी झाल्यावर देखील लवकर पैसे मिळत नसल्याने सुविधांपेक्षा अडचणीचं जास्त आहेत. त्यामुळे शेतकरी खरेदी केंद्राकडे पाठ फिरवून खुल्या बाजारपेठेला जास्त पसंत करत आहते.
ही वाचा (Read This ) इसबगोल : रब्बीत भरगोस उत्पन्न मिळवून देणारे पीक !