इतर बातम्या

चिप्सचा व्यवसाय सुरू करायचा ? वाचा संपूर्ण माहिती !

Shares

अनेक शेतकरी शेती बरोबर जोडधंदा म्हणून नवीन व्यवसायाच्या शोधात असतात. असा एक व्यवसाय आहे जो शेतकरी अगदी सहजपणे सुरु करू शकतो. उत्तम आणि सहज नफा मिळवून देणारा व्यवसाय म्हणजे बटाटा प्रक्रिया उद्योग. म्हणजेच बटाट्यापासून वेफर्स , चिप्स बनवून त्यांची विक्री करणे. भारतातच नाही तर जगभर हा व्यवसाय करता येतो. बाजारामध्ये अनेक कंपन्या बटाटा प्रक्रिया उद्योग करतात. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी कमीत कमी एक ते दीड लाख रुपयांचा खर्च येतो. या व्यवसायाचे योग्य नियोजन केल्यास लाखों रुपये यातून आपण कमवू शकतो. या व्यवसायासाठी काही यंत्रांची गरज असते. या यंत्राची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.
बटाटा प्रक्रिया उद्योगासाठी लागणारी यंत्रे –
साल काढण्याचे यंत्र –
१. चिप्स तयार करतांना सर्वप्रथम बटाटे स्वच्छ धुवून त्याचे साल काढावे लागते. यासाठी बाजारात अनेक यंत्र उपलब्ध आहेत.
२. या यंत्रावरील हिचकती बटाट्यावरून फिरवावी लागते म्हणजे साल निघून वेगळी होईल.
३. या चूकीचा १४ इंच व्यास असून याची जाडी ०.५ इंच पर्यंत असते.
४. या यंत्राचे वजन ५५ किलो पर्यंत असते.
५. हे यंत्र एकाच वेळेस १० बटाट्याचे साल काढते.
६. या यंत्राची किंमत १६ हजार व त्याहून अधिक असते.

बटाटा कापणी यंत्र –
१. बटाट्याचे साल काढल्यानांतर त्याचे पातळ गोलाकार काप करावे लागतात.
२. या यंत्रामध्ये सिंगल फेज मीटर वापरले जाते.
३. एका तासात २०० किलो बटाट्याचे काप करता येते.
४. या यंत्रणेची किंमत २० हजार व त्याहून अधिक आहे.

ड्रायर –
१. बटाट्याचे चिप्स दीर्घकाळ टिकावेत यासाठी बटाटे वाळवून त्यातील पाणी काढणे आवश्यक असते.
२. हे यंत्र बटाटयाच्या काप मधील पाणी शोषून घेऊन त्यातून पाणी आतील गोलाकार भांड्यात साठवले जाते.
३. टप्प्याटप्याने यातील पाणी काढून टाकावे लागते.
४. या यंत्रणेच्या साहाय्याने १० किलो बटाटयाच्या कापातील पाणी एकाच वेळेला काढता येते.
५. या यंत्राची किंमत २६ हजार व त्याहून अधिक आहे.

तळण यंत्र –
१. शेवटचे व महत्वाचे वाळवलेले चिप्स तळणे.
२. या यंत्रामध्ये तेल गरम होऊन हे तेल सातत्याने फिरते ठेवले जाते. जेणेकरून तेल खराब होणार नाही,
३. हे यंत्र पूर्णपणे ऑटोमॅटिक सिस्टीम वर चालते.
४. एका तासात २० ते २५ किलो चिप्स तळले जातात.
५. या यंत्रणेची किंमत ५० हजार व त्या पेक्षा अधिक आहे.

बटाट्यापासून चिप्स बनवण्याचा हा लघु उद्योग कमी जागेत देखील उभारता येतो. बाजारात चिप्स ला मोठ्या संख्येने मागणी असते. त्यामुळे योग्य नियोजन केल्यास यापासून अधिक नफा मिळवता येतो.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *