विधवा महिलांसाठी पेन्शन योजना !

Shares

शासनाकडून समाजाला मदत व्हावी यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. त्यामागचा मुख्य उद्देश असा असतो की समाजातील समस्या कमी व्हाव्यात. विधवा महिलांचा उदरनिर्वाह व्हावा यासाठी केंद सरकारकाढून एक योजना राबवली जात आहे. या योजने अंतर्गत विधवा महिलांना महिन्याकाठी एक ठराविक रक्कम दिली जाते जेणेकरून त्यांना आर्थिक मदत होईल. विधवा महिलांना मदत होईल यासाठी राज्य सरकारदेखील पेन्शन सुविधेचा लाभ देतात. साधरणतः ४० ते ५९ वयोगटातील महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाते. जेणेकरून लाभार्थ्यांना थेट लाभ होईल.विधवा पेन्शन योजनेची संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.

विधवा पेन्शन योजनेचा लाभ –
१. कुटुंबात एकापेक्षा जास्त मुले असतील तर योजनेद्वारे दरमहा ९०० रुपये दिले जातील.
२. महाराष्ट्रातील सर्व जाती , धर्मातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
३. ठरलेली रकम थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
४. विधवा झालेल्या महिलेस मुलगा असेल तर तो मुलगा २५ वर्षाचा होईपर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल.
५. विधवा महिलेस मुलगी असेल तर तिच्या लग्नापर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल.

विधवा महिला पेन्शन योजनेसाठी पात्रता –
१. अर्जदार महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा.
२. बँक अकाउंट आधारकार्ड सोबत जोडलेले असावेत.
३. दारिद्रय रेषेखालील अर्जदारास प्राधान्य दिले जाईल.
४. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न २५००० पेक्षा अधिक नसावेत.

विधवा महिला पेन्शन योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे –
१. आधार कार्ड
२. गॅस असल्यास त्याचा पुरावा
३. पासपोर्ट फोटो
४. मोबाइल क्रमांक
५. उत्पन्नाचे प्रमाणपत्र
६. अपंग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
७. पतीचे मृत्यू पत्र

विधवा पेन्शन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ?
१. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यानुसार असलेल्या संकेतस्थळावर जावे लागते.
२. वेबसाईट उघडल्यानंतर त्यावर विधवा पेन्शन योजनेच्या पर्यायावर क्लिक करावे लागते.
३. त्यांनतर एक रेजिस्ट्रेशन करण्यासाठीचा अर्ज दिसेल.
४. या अर्जामध्ये विचारलेल्या माहितीची नोंदणी करावी लागते.
५. संपूर्ण माहिती भरून झाल्यावर दिलेल्या सबमिट बटनावर क्लिक करा.
६. त्यानंतर भरलेला अर्ज दिसेल त्याची प्रिंट काढून घ्या.

अर्जाची प्रिंट काढणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला भविष्यात त्याचा वापर करता येईल. विधवा महिलांनी आपल्या दैनिक गरज पूर्ण करण्यासठी या योजनेचा लाभ घ्यावा.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *