पावसाने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी !
अतिवृष्टी, दुष्काळ , अवकाळी पाऊस अश्या सततच्या बदलत्या वातावरणामुळे पर्यावरणाने खेळच मांडला आहे असे म्हणता येईल. या खेळामध्ये सर्वात जास्त नुकसान हे शेतकऱ्यांचे झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.ऐन हिवाळ्यात पावसाने लावलेल्या हजेरीमुळे फळभाज्या , भाजीपाला पुरवठ्यावर दर वाढीचे संकट उभे राहिले आहे.अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांबरोबर भाजी, फळ विक्रेत्यास देखील बसला आहे.उत्तर महाराष्ट्रामधील अनेक भागामध्ये फळबागांचे मोठ्या संख्येने नुकसान झाले असून कांदा , द्राक्ष उत्पादकाला तर धडकीच बसली आहे.रत्नागिरीमध्ये हापूस आंब्याचा लाखों रुपयांचा मोहर पाण्यात गेला असून अनेक शेतकऱ्यांनी भात, उडीद, मका, पिके कापून ठेवली होती ही पिके उचलून यांची रास कशी करावी याच्या काळजीत शेतकरी पडला आहे. याचबरोबर टोमॅटो, स्ट्रॉबेरी पिकास हा पाऊस अत्यंत घटक ठरत आहे.
हवामान खात्याने पुढील ३ दिवस पावसाचा अंदाज सांगितला आहे. त्यामुळे चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्यांनी आम्ही शेतकऱ्यांनी करावे तरी काय? असा प्रश्न त्यांनी केंद शासनाला विचारला आहे.