आता द्राक्ष खरेदीचे तोंडी सौदे बंद, फसवणुकीला बसणार आळा- उत्पादक संघाचा निर्णय
आता द्राक्षाची आवक वाढत असून द्राक्ष खरेदी फसवणूकीच्या अनेक घटना समोर येत आहेत. ही फसवणूक रोखण्यासाठी द्राक्ष उत्पादक संघाकडून एक रामबाण उपाय मांडला जात आहे. तो असा की, द्राक्ष खरेदीचे केवळ तोंडी सौदे न करता सौद्याची पावती तयार केली जाणार असून यासाठी लोकप्रतिनिधी, अभ्यासू वकील यांचे मार्गदर्शन घेतले जात आहे. द्राक्ष तोडणीच्या आगोदर केवळ (Grape Deals) तोंडी सौदे होत असल्याने मालाची खरेदी होणारच असे नव्हते. व्यापारी त्यांना नुकसान दिसल्यास सौदे होऊन देखील खरेदीकडे पाठ फिरवत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना काय भूमिका घ्यावी याबाबत द्वीधा मनस्थिती होत असत. आता लेखी पुरावा असल्यामुळे खरेदी करणे हे बंधनकारक राहणार आहे. यापुर्वी फसवणूकीचे प्रकार झाल्यामुळे गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचेच अधिकचे नुकसान झाल्यामुळे द्राक्ष लेखी पध्दतीने खरेदी-विक्री केली जाणार असल्याची माहिती द्राक्ष उत्पादक संघाने दिली आहे.
ही वाचा (Read This) सोयाबीन आणि तुरीच्या दरात दिलासादायक वाढ !
द्राक्ष उत्पादक संघ घेणार कायद्याची मदत
राज्यात सध्या केवळ तोंडी द्राक्ष खरेदीचे सौदे केले जात असून यानुसार इसार स्वरुपात काही रक्कम दिली जाते. मात्र, यानंतरही खरेदीवरुन फसवणूकीच्या घटना घडलेल्या आहेत. यामध्ये काही पुरावेही नसल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. शिवाय दिवसेंदिवस हे प्रकार वाढत आहे. हंगामाच्या सुरवातीला व्यापारी सौदे करण्यास तयार होतात मात्र, ऐन वेळी माघार घेत असल्यामुळे द्राक्षाची विक्री करावी की नाही हे कोडे शेतकऱ्यांसमोर असायचे. त्यामुळे आता द्राक्ष उत्पादक संघ कायद्याचा आधार घेणार आहेत. तोंडी सौदे हे धोकादायक असल्याने अनेक द्राक्ष उत्पादक सांगत आहे.
ही वाचा (Read This) हापूस आंब्याची बाजारात जोरदार एन्ट्री, ८ हजार १०० रुपये डझन
व्यापारी २ महिन्यापूर्वी पासूनच बांधील राहतील
लोकप्रतिनिधी, पोलीस प्रशासन, तज्ञ यांच्या सोबत द्राक्ष बागायतदार संघाने चर्चा केली असता तोंडी सौदे करण्यापेक्षा लेखी सौदे करून त्याची पावती घेतल्यास फसवणुकीवर आळा बसेल असा निष्कष निघाला होता. आता या निर्णयानंतर २ महिन्यापूर्वीच बागायतदार संघांना प्रक्रिया सुरु झाल्याचे घोषित केले होते. आता ही प्रक्रिया अंतिम टप्यात आहे. यानंतर सौदे लेखी स्वरूपात असणार आहे त्यामुळे व्यापारी द्राक्ष खरेदीसाठी बांधील राहतील तर फसवणुकीवर आळा बसेल.
ही वाचा (Read This) कांद्याची आवक वाढूनही दर स्थिरावले