राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठीची ही योजना केली बंद, ज्यांनी या योजनेचा लाभ घेतला त्यांच्या अनुदानाच काय ?
२०१५ मध्ये युती सरकार काळात ‘मागेल त्याला शेततळे’ हि योजना सुरु केली होती, या योजनेने शतकरी देखील आनंदित झाले होते. अनेक शेतकऱ्यांना योजनेचा फायदा देखील झाला, परंतु महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्या पसून या योजनेकडे दुर्लक्ष झाले असे लक्षात येते. त्यामुळे लाखो अर्जदारांना शेततेळे योजनेचा लाभ मिळाला नाही. आता हि योजना पूर्णताः बंद करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. हि योजना बंद झाल्याने आता ज्यांना मंजुरी मिळाली आहे त्याचं काय? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. तसेच हाती आलेल्या माहिती नुसार अनेक मंजुरी मिळालेल्या शेतकऱ्यांची मंजुरी देखील रद्द झाली आहे.
हे ही वाचा (Read This शेतीसाठी उपकरणे खरेदी करण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, शेतकऱ्यांना मिळतोय ५० ते ८० टक्केपर्यंतचे अनुदान मिळणार
किती लागतो शेततळे उभारणीला खर्च
खोदकाम,अस्थिरीकरणअन आणि संरक्षण तारांचे कुंपण असलेली सामोहिक शेततळे २४ बाय २४ बाय ४ मीटर याला १ लाख ७५ हजार तर ३० बाय ३० बाय ४.७ च्या सामोहिक शेततळ्यासाठी २ लाख ४८ हजार एवढा खर्च येतो. ३४ बाय ३४ बाय ४.४ मीटर एवढ्या शेततळ्यासाठी ३ लाख ३९ हजार एवढा खर्च लागतो मात्र शासकीय अनुदान मिळाल्यास शेततळ उभारणीस सोयीचे जाते.
हे ही वाचा (Read This दुग्धव्यवसायाशी निगडित शेतकऱ्यांसाठी, अनेक वस्तूंवर 25 टक्क्यांपर्यंत अनुदान उपलब्ध
अशा प्रकारे होते अनुदान
या योजने अंतर्गत सात प्रकरच्या आकाराची शेततेळे निश्चित केली होतो त्यातील ३० बाय ३० बाय ३ मीटर हे सगळ्यात मोठे तर १५ बाय १५ बाय २ हे सगळ्यात छोटे शेततळे होते. यात ३० बाय ३० बाय ३ मीटर यासाठी कमाल अनुदान ५० हजार एवढे होते.
हे ही वाचा (Read This ) कमीत कमी पाण्यात करा या पिकाची लागवड, मिळवा भरगोस उत्पन्न
का बंद केली योजना
एका कृषी अधिकाऱ्याने दिलेल्या माहिती नुसार, या योजनेला शेतकऱ्यांनी भरगोस प्रतिसाद दिला. दर वर्षी लाखो अर्ज येत होती, त्यातील शेकडो अर्ज निकालीही लागत होतो. मात्र दरवर्षी अर्ज निकाली न लावल्याने आणि कामासाठी निधीची तरतूद न झाल्याने हि योजना बंद झाली.
हे ही वाचा (Read This अभ्यासपूर्वक शेती करणं हि आता काळाची गरज…खूप महत्वाचं एकदा वाचाच