या पिकाची करा लागवड, कमी खर्चात जास्त नफा
शेतकरी सतत कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या पिकाच्या शोधात असतो. या पिकांमध्येमध्ये औषधी वनस्पतींचा समावेश होतो. औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी खर्च कमी लागतो आणि नफा जास्त मिळवता येतो. यामुळे शेतकऱ्यांचा अधिक कल आता औषधी वनस्पतींच्या लागवडीवर आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीव्यतिरिक्त इतर शेती करून अधिक उत्पन्न मिळवावे यासाठी सरकार देखील मदत करते. औषधी वनस्पतींबरोबर फळे, फुले, भाज्या यांच्या शेतीसाठी देखील सरकार मदत करते. आपण आज शतावरी औषधी वनस्पतीची माहिती जाणून घेणार आहोत.
शतावरीच्या मुख्य २ प्रजाती आहे. पहिली प्रजाती औषध म्हणून वापरली जाते तर दुसरी प्रजाती ही भाजी म्हणून वापरण्यात येते. याव्यतिरिक्त शतावरीच्या २२ प्रजाती आहेत. शतावरीचे अनेक फायदे आहेत.
हे ही वाचा (Read This ) शेतकरी मित्रांनो, SHCS या योजनेचा आपण लाभ घेतला आहे का ?
शतावरीचे फायदे
शतावरी ही अनेक आजारांवर उपयोगी ठरत असून शतावरीच्या मुळ्या औषधी गुणधर्मांनी संपूर्ण असतात. शतावरीमध्ये सपोनीन, ग्लायकोसाईडस्, अल्कालॉईड आणि अस्पराजेमीन इत्यादी घटक उपलब्ध असतात. शतावरीच्या मुळया अधिक शक्तिवर्धक असतात. बाळंतपणामध्ये आईस अशक्तपणा घालवण्यासाठी देतात. शतावरीच्या मुलांची पावडर ही दुधासोबत टॉनिक म्हणून दिली जाते. मधुमेह, कावीळ, मूत्ररोग, मधुमेह यांसारख्या आजारांवर शतावरी गुणकारी ठरते. तसेच शतवारीपासून तयार केलेले तर संधिवात , अर्धांगवायू साठी वापरण्यात येते.
हे ही वाचा (Read This ) या जिल्ह्यात १०० ड्रोन कृषी सेवा उभारण्याचा निर्धार
शतवारीपासून औषध तयार केले जाते
शतावरीमध्ये प्रोटिन, म्युसिलेज, हेमिसेल्युलोज यांसारखे उपयुक्त घटकसुद्धा उपलब्ध आहेत. शतावरीची लागवड बियाणे पेरून किंवा क्राऊन्स (ठोंब) पासून वर्षभर करता येते. भाजीपाल्यासाठी शतावरीच्या कोंबांची छाटणी करतात. तर औषधीसाठी औषधी शतावरीच्या मुळांची छाटणी करतात. मुळावरची साल काढून आतली शीर काढून त्याचे १० ते १५ सें.मी. लांबीचे तुकडे करून सावलीत वाळवले जातात.
हे ही वाचा (Read This ) रासायनिक, जैविक, सेंद्रिय, शेतीचे अनेक प्रयोग ऐकले पण आता होमिओपॅथिक शेती
शतवारीची लागवड करून मिळवा नफा
शतावरीचा वापर भाजी म्हणून तसेच औषधी तयार करण्यासाठी केला जातो. शतावरी ही अत्यंत गुणकारी असल्यामुळे औषध तयार करण्यासाठी त्याची मागणी अनेक औषधी कंपन्या करतात.त्याची शेती करण्यासाठी जास्त खर्च येत नसून अधिक नफा मिळण्यास मदत होते.
हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळणार, असा करा अर्ज