शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळाला, महावितरणकडून अशी मिळवा आर्थिक मदत
यंदा सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना नैसर्गिक , आर्थिक अश्या दोन्ही संकटांचा सामना करावा लागला आहे. तर मागील ३ दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात तर द्राक्ष बागा उध्वस्थ झाल्या असल्या तरी ऊस पिकावर याचा परिणाम झाला नव्हता. पण ते म्हणतात ना होनी को कोई टाल नाही सकता असेच काही ऊसाच्या बाबतीत होत आहे.
हे ही वाचा (Read This ) नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना – शेत-शिवाराचे होणार कायापालट, 75% मिळणार अनुदान
मागील काही दिवसांपासून ऊसाच्या शिवारात आग लागण्याच्या घटना घडत आहेत. असाच एक प्रकार येवला तालुक्यात घडला. वादळी वाऱ्यामुळे वीज तारांचे घर्षण होऊन त्याच्या ठिणगी मुळे अवघ्या कमी मिनिटातच १ एकरातील ऊस जाळून राख झाला.
महावितरणकडून मिळवा आर्थिक मदत
ऊस जाळण्यास महावितरण कारणीभूत असेल तर शेतकऱ्यांना महावितरणच्या कार्यालयात संबंधित कागदपत्रे अर्जासोबत जमा करावी लागतील. त्यानंतर त्यांना महावितरणकडून आर्थिक मदत मिळेल.
या कागदपत्रांमध्ये ३ वर्षाचा सातबारा, किती क्षेत्रात ऊस जळाला आहे याचा फोटो, महसूल विभाग आणि पोलिसांनी केलेला पंचनामा, ऊसाबरोबर पाणीपुवठा तसेच ठिबक करणारे इतर साहित्य या घटनेत जळाले असेल तर त्यांचे बिल, साखर कारखान्याचे मागील ३ वर्षातील बिल अर्जासोबत जोडावी लागतील.
हे ही वाचा (Read This ) कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आता वर्षभर पाण्याचे नो टेन्शन, आलंय नवीन आगळंवेगळं तंत्र
एक ठिणगीने लावले शेतकऱ्यांचा स्वप्नांना आग
यंदा ऊस हा तोडणीला आला असला तरी त्याची तोडणी ही वेळेत होत नसल्यामुळे शेतकरी आधीच अनेक समस्यांना सामोरे जात होता. त्यात शेतकऱ्यांचे बऱ्याच प्रमाणात नुकसान होत होते. आता या मध्ये अजून एका राखरांगोळी करणाऱ्या ठिणगीची भर पडली आहे.
मागील काही दिवसापासून सातत्याने ऊस शिवारास आग लागण्याच्या घटना समोर आल्या आहेत. याचे कारण म्हणजे शेतावरून जात असलेल्या विजेच्या तारा. या घटनांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून याला जबाबदार कोण आणि भरपाई कोण देणार असा प्रश्न शेतकरी महावितरणकडे करत आहेत.
हे ही वाचा (Read This ) शेतीतील एक वेगळा प्रयोग, या पिकाची लागवड करून घ्या चांगले उत्पन्न