इतर बातम्या

शेणातून मिळणार ३०,००० रुपये !

Shares

शेणापासून काय काय तयार करता येते? शेणाचा वापर हा शेतकरी राजा खतनिर्मितीसाठी करतो. पण “खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने” वेगळा विचार करत गायीच्या शेणापासून ‘रंग’ तयार केले आहेत. पर्यावरणाला पूरक असणारे हे रंग विषरहित आहेत. एका वर्षाच्या संशोधनानंतर हे पर्यावरणस्नेही आणि विषारी नसलेले ‘खादी प्राकृतिक पेंट’ तयार करण्यात आले आहे. बुरशी रोधक आणि जीवाणू रोधक असलेल्या ह्या पेंटची मागणी आता वाढत आहे. या शिवाय इतर कंपन्यांनी बनविलेल्या रंगांच्या तुलनेने या रंगांची किंमत जवळपास अर्धीच आहे. ह्या रंगांना भारतीय प्रमाणीकरण संस्थेने प्रमाणित केले आहे. या रंगाचे पेटंट मिळवले आहे ते जयपूर मधल्या कुमरप्पा नॅशनल हँडमेड पेपर इनस्टिट्यूटने. रंग तयार करण्यासाठी शेणात शिसे, पारा, क्रोमियम, आर्सेनिक आणि कॅडमियम यांचा वापर केला आहे.
जयपूरमध्ये शेणापासून रंग तयार करण्याच्या ऑटोमॅटिक मशीनचे उद्घाटन झाले आहे. शेणापासून वेगवेगळे रंग बनविण्यासाठी एक प्लांट उभारायचा झाल्यास त्याला सुमारे 15 लाख रुपयांचा खर्च येतो. या माध्यमातून रोजगारनिर्मिती झाली तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकेल. पर्यावरण स्नेही उत्पादनासाठी कच्चा माल म्हणून गायीच्या शेणाचा वापर होणार आहे. शेतकऱ्यांना जास्तीच्या उत्पन्नाचे साधन मिळणार आहे. गायीच्या शेणाचा उपयोग केल्याने पर्यावरण स्वच्छ राहण्यासाठी मदत होणार आहे.
सध्या बाजारात पर्यावरणाला हानी न करणाऱ्या पर्यावरणस्नेही रंगाला मोठी मागणी वाढली आहे. हे रंग शेणापासून तयार करण्याचे प्रशिक्षण हे जयपूरमध्ये देण्यात येते. नशीब बदलवून टाकणारे हे प्रशिक्षण घेण्यासाठी अनेक जण इच्छूक आहेत. सध्याच्या स्थितीत ७ दिवसांचे असणारे हे प्रशिक्षण येत्या काळात जास्त विस्तृत होणार आहे. या व्यवसायाची माहिती आणि प्रशिक्षण सर्व लोकांपर्यंत पोहोचल्यास प्रत्येक गावात लोक शेणापासून रंग बनविण्याची कंपनी स्थापन करु शकतात. देशातील युवा उद्योजकांना या व्यवसायात आणण्यासाठी देशभरात या वेदिक पेंटच्या वापराला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
खादी प्राकृतिक पेंट, डिस्टेम्पर आणि प्लास्टिक इमल्शन अशा दोन स्वरुपात उपलब्ध आहे. यांची किंमत सुमारे डिस्टेम्पर १२० रुपये प्रती लिटर आणि इमल्शन २२५ रुपये प्रती लिटर अशी आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या ब्रॅंडेड पेंटच्या तुलनेत खादी प्राकृतिक पेंटची किंमत जवळपास अर्धी आहे.
शेणापासून तयार करण्यात आलेल्या रंगाची विक्री वाढल्यानंतर गावामध्ये शेणाची खरेदी केली जाईल. या शेणाच्या विक्रीतून शेतकऱ्यांना वर्षाकाठी 30 हजार रुपये मिळतील. शेतकरी सध्या शेणाचा फक्त खत म्हणून वापर करतात. मात्र, रंगाच्या कंपन्या निर्माण उभारल्या गेल्यावर उत्पन्नाचे एक नवे साधन सर्व शेतकऱ्यांना मिळू शकते.

ब्युरो रिपोर्ट – किसनराज डेस्क

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *