पेस्टीसाईडचा सुरक्षित वापर करणे आहे अत्यंत गरजेचे
देशातील वाढती लोकसंख्या पाहता अन्नाची गरज देखील वाढत चालली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त उत्पादन मिळावे तसेच रोगापासून पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी पेस्टीसाईडचा वापर वाढत चालला आहे. यामध्ये बुरशीनाशक, कीटकनाशक, कवकनाशक, आदींचा समावेश केलेला असतो. पिकांच्या उत्तम वाढीसाठी, चांगल्या उत्पादनासाठी याचा वापर करणे काही प्रमाणात गरजेचे आहे. परंतु याचा अतिवापर केल्यास पिकावर त्याचे दुष्परिणाम होतात.
हे ही वाचा (Read This) शेतकऱ्यांनी जिप्समचा वापर केव्हा आणि कसा करावा, काय घ्यावी काळजी ?
पिकांबरोबर जल प्रदूषण , माती प्रदूषण, वायू प्रदूषण होऊन पर्यावरणावर याचा अनिष्ट असा परिणाम होतो. त्यामुळे पेस्टीसाईडचा कमी व प्रमाणात वापर करणे गरजेचे ठरते. आपण पेस्टीसाईड वापरतांना नेमकी कोणती काळजी घ्यावी याची माहिती जाणून घेणार आहोत.
पेस्टीसाईड वापरतांना घ्यावयाची काळजी
- नोंदणी असलेल्या केंद्रातूनच याची खरेदी करावीत.
- पॅकिंग वरील बॅच नंबर , लेबल तपासूनच खरेदी करावेत.
- पेस्टीसाईडची खरेदी गरजेनुसार योग्य प्रमाणात करावी.
- फवारणीपूर्वी तयार झालेले फळ , भाज्या खुडून टाकाव्यात.
- अंदाज बांधून वाऱ्याच्या वेगानुसार फवारणी करावीत.
- पेस्टीसाईड तसेच इतर औषधी पॅकेट तोंडाने फोडू नये.
- वारंवार एकच , एकाच प्रकारचे औषध फवारू नये.
- याच्या फवारणीसाठी योग्य मशिनरींचा वापर करावा. जसे पंप , ब्लोअर.
- फवारणी करण्यापूर्वी यंत्राची योग्य तपासणी करून स्वच्छ करून घ्यावे.
- कोणतीही फवारणी ही शक्यतो संध्याकाळीच करावीत.
- फवारणी करतांना हात मोजे, मास्क वापरणे गरजेचे आहे.
- पेस्टीसाईड खरेदी तसेच वापर करतांना कृषी तज्ञांचा सल्ला घ्यावा.
हे ही वाचा (Read This) या सोप्या पद्धतीने करा उत्तम कंपोस्ट खत तयार !
पेस्टीसाईडचा वापर हा गरजेचा असला तरी प्रमाणात करणे अत्यंत गरजेचे आहे.
हेही वाचा :बँकेच्या वेळा बदलल्या, RBI चा मोठा निर्णय