उन्हाळ्यात प्या हे बहुगुणी ताक

Shares

उन्हाळा म्हंटले की सर्वांच्या घरोघरी ताक बनण्यास सुरुवात होते. याचे मुख्य कारण म्हणजे ताक हे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते. या व्यतिरिक्त देखील ताकाचे अनेक फायदे आहेत. ते कोणते हे आपण आज जाणून घेणार आहोत.

ताकात विटामिन बी-१२, कैल्शियम, पोटेशियम आणि फास्फोरस असतात जी मानवी शरीरास खूपच उपयुक्त असतात.

हे ही वाचा (Read This) या सोप्या पद्धतीने करा उत्तम कंपोस्ट खत तयार !

ताकाचे फायदे

  • ताक पिल्याने वजन कमी होवुन लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.
  • शरीरातील उष्णता वाढली असेल तर ताक पिल्यास उष्णता कमी होण्यास मदत होते.
  • उन्हाळ्यात सततचा होणारा पित्ताचा त्रास कमी करावयाचा असेल तर ताकात साखर आणि काळी मिरी घालुन प्या.
  • ताकाचे सेवन केल्‍याने उष्णता कमी होऊन अतिशय शांत झोप लागते.
  • पोट साफ होण्यासाठी ताक हा उत्तम पर्याय आहे. ताकामध्ये ओवा टाकून पिल्यास अधिक लवकर आराम मिळण्यास मदत होईल.
  • तोंड आले असता ताकाने हळुवार गुळण्या केल्यास तोंड लवकर बरे होते.
  • काहीवेळा उचकी आपल्याला अचानक लागते. तेव्हा घरगुती उपाय म्हणजे ताक
  • बऱ्याचवेळा पाण्याची कमतरता जाणवते. ही कमतरता भरून काढण्यासाठी ताक उपयोगी पडते.
  • तुमचं डोकं दुखत असेल तर जायफळ पावडर टाकून ताक प्या.

हे ही वाचा (Read This)  शेतकऱ्यांनी जिप्समचा वापर केव्हा आणि कसा करावा, काय घ्यावी काळजी ?

तुम्ही आपल्या आवडीनुसार ताकामध्ये विविध पदार्थ टाकून सेवन करू शकता. ताकात जिरे पावडर, कोथंबीर, हिरव्या मिरच्या घालणे. हे सर्व घटक ताकाची चव आणि ताकाचा औषधी गुणधर्म वाढवतात. प्रत्त्येकजण आपल्या आवडीनुसार हे घटक घालत असतो.

टीप – कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा

हेही वाचा :बँकेच्या वेळा बदलल्या, RBI चा मोठा निर्णय

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *