परराज्यातील आवक वाढल्यामुळे कांद्याच्या भावात घट, जाणून घ्या आजचे दर
आधीच अवकाळीमुळे उत्पादनात मोठी घट झाली असून पिकांच्या लागवड आणि व्यवस्थापनासाठी अधिकचा खर्च लागला आहे. त्या खर्चाच्या तुलनेत अगदी कवडीमोलाचा दर मिळत आहे. त्यात आता पेट्रोल , डिझेल , गॅस असे सर्वच गोष्टींच्या दरामध्ये वाढ झाली आहे.त्यामुळे शेतकरी अधिक चिंतेत असल्याचे निदर्शनास येत आहे.
कांद्याला कमी बाजारभाव
सध्या बाजार समितीत नवीन कांदा विक्रीसाठी येत आहे. शेतकरी कांद्याची काढणी झाल्याबरोबर तो लगेच बाजार समितीत आणून विक्री करतो. या कांद्याला वजन असल्याने शेतकऱ्यांना फायदा होतो. मात्र, कांद्याचे बाजारभाव कमी झाले आहेत.
हे ही वाचा (Read This) सोयाबीनला ढगाळ वातावरणाचा फटका? आवक वाढली, जाणून घ्या आजचे दर
कांद्याचा आजचा दर
हे ही वाचा (Read This) अर्थसंकल्प २०२२-२३ – शेतकऱ्यांसाठीच्या या महत्वाच्या घोषणा, एकाच बातमीत
मागील लिलावापेक्षा कमी दर
मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती समितीमधून कांदा पुणे, मुंबई, दिल्ली, राजस्थान, गिजरत, कर्नाटक येथे पाठवला जातो. तर या परिसरातील शेतकरी कांदा विक्रीसाठी या बाजारपेठेमध्ये घेऊन येतात.
तर या बाजारपेठेमध्ये मागील लिलावापेक्षा २० रुपयांनी घट झाली असून गोडा कांदा हा १७० ते १८० रुपयांचा १० किलो प्रमाणे विकला गेला आहे.