कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन
किटकशास्त्र विभागात दर महिन्याच्या दि ब १६ ला विदर्भातील सर्व जिल्हयातील किटकशास्त्रज्ञांची पिकावरील किड परिस्थिती संदर्भात आढावा बैठक घेण्यात येत असते. या बैठकीत विदर्भातील सर्व संशोधन केंद्रे, कृषि विज्ञान केंद्रे व कृषि महाविद्यालय येथील कार्यरत किटकशास्त्रज त्यांना नेमून दिलेल्या तालुक्यात तेथील कृषि अधिका-यासमवेत सर्वेक्षण करून किड़ परिस्थितीबाबत माहिती सादर करतात नुकत्याच दि. १६/१०/२०२० रोजी विदर्भातील सर्व किटकशास्त्रज्ञांच्या ऑनलाईन आढावा सभेतील चर्चेनुसार सप्टेंबरच्या दुस-या पंधरवाडयात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव 5 टक्कया पर्यंत होता पंरतु त्यात वाढ होऊन ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाड्यात तो १० टक्के झाला. सदयपरिस्थितीतील वातावरण गुलायी योडअळीच्या वाढीसाठी अत्यंत पोषक आहे त्यामुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावासाठी कपाशी पिकाचे नियमित सर्वेक्षण कस्त खालील उपाययोजना कराव्यात.
१. फेरोमोन सापळयाचा वापर करावा. यासाठी एकरी दोन किंवा हेक्टरी पाच फेरोमान सापळे लावावे. सतत तीन दिवस या सापळयामध्ये आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजाये.
२. फुलावस्थेत दर आठवडयाने पिकामधे मजुरांच्या सहायाने डोमकळया (गुलाबी बोंडअळी रास्त फुले) शोभून नष्ट कराव्या.
३. ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अॅझॉडिरेक्टीन ०.०३ (३०० पीपीएम) ५० मिली किंवा ०.१५ टक्के (१५०० पीपीएम) २५ मिली प्रति १० ली पाण्यात मिसळून फवारणी करावी.
४. प्रत्येकआठवडयाला एकरी शेतीचे प्रतिनीधीत्य करतील अशी 20 झाडे निवडूननिवडलेल्या प्रत्येक झाडावरील मध्यम आकाराचे मध्यम पक्य झालेले बाहेरून फिडके नसलेले एक बोंड असे २० बॉडे तोडून ते भुईमुगाच्या शेंगाप्रमाणे दगडाने दिपवून त्यामधील त्यामधील किडक बोंड व अळयाची संख्या मोजून, ती दोन किडक घोड किंया दोन पांढूरक्या/गुलाबी रंग धारण करीत असलेल्या अळया आढळल्यास आर्थिक नुकसान पातळी (५ ते १० टक्के) समजून खालील सांगीतल्याप्रमाणे रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी.
५. थायोडीकार्य ७५ टक्के डब्ल्युपी २५ यॉम किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के एएफ २५ मिली किंवा क्लोरपायरीफॉस २५ टक्के प्रवाही २५ मिली किंवा प्रोफेनोफॉस ५० टक्के २० मिली किंवा इंडोक्साकार्ब १५.८ टक्के १० मिली किंवा डेल्टामेशीन २.८ टक्के १० मिली या पैकी कोणतेही एक किटकनाशक प्रती १० लिटरपाण्यात मिसळून फवारणी करावी.
६. जेथे प्रादुर्भाव १० टक्केच्यावर आहे अशा ठिकाणी आवशक्ते अनुसार प्रादुर्भाव पुढे याद नये म्हणुन खालील पैकी कोणत्याही एका मित्र किटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ट्रायझोफॉस ३५ टक्के + डेल्टामेशीन १ टक्के १७ मिली किंवा क्लोरेंट्रानिलीप्रोल ९.३ टक्के + लँब्डासायहॅलोशीन ४.६ टक्के 5 मिली किंवा क्लोरपायरीफॉस ५० टक्के + सायपरमेथ्रीन 5 टक्के २० मिली किंवा इंडोयाकार्य १४. ५ टक्के + असिटामॅप्रिड ७. ७टक्के १० मिली.