कमी कालावधीत घ्या कोबीचे उत्तम उत्पादन

Shares

रोजच्या आहारात आपण पालेभाज्या घेत असतो.त्यामुळे शेतकरी मुख्य पिकाबरोबर पालेभाज्यांचे पीकही घेत असतो. पालेभाज्यांची शेती केल्यास कमी वेळात उत्तम, जास्त उत्पादन मिळते.महाराष्ट्रामध्ये हिवाळ्यात कोबी , फुलकोबीची लागवड जास्त संख्येने केली जाते.कोबीमध्ये लोह , जीवनसत्व ए , पोटॅशिअम, सोडियम , खनिजे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. महाराष्ट्रात फुलकोबीखाली अंदाजे ७००० हेक्टर तर कोबीखाली ७२०० हेक्टर क्षेत्र आहे. कोबी पिकासाठी योग्य पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. लागवडीनंतर २ महिन्यांनी कोबी तयार होते. जाणून घेऊयात कोबी लागवडीची संपूर्ण माहिती.

जमीन व हवामान –
१. कोबी , फुलकोबीस थंड हवामात मानवते.
२. सर्व प्रकारच्या जमिनीत फुलकोबीचे पीक घेता येते.
३. हलक्या प्रतीच्या जमिनीत ही पिके बहरतात.
४. आम्लयुक्त जमिनीत या पिकांची लागवड करणे टाळावेत.
५. या पिकांच्या वाढीसाठी १५ ते २० अंश सेल्सिअस तापमान उत्तम ठरते.
६. लागवडीपूर्वी जमिनीची योग्य मशागत करणे गरजेचे आहे. अन्यथा पिकांची वाढ खुंटते.
७. हिवाळाच्या सुरुवातीस या पिकाची लागवड करावी.
८. फुलकोबी संवेदनशील पीक असल्यामुळे त्यांची हवामानानुसार लागवड करणे महत्वाचे आहे.

खत व पाणी व्यवस्थापन –
१. लागवड करतांना जमीन ओली करण्यापूर्वी कोबीची ८० किलो एन , ८० किलो पी यांचे मिश्रण देणे आवश्यक आहे.
२. लागवडीनंतर १ महिन्याने ८० किलो एन चा दुसरा डोस द्यावा.
३. लागवड करतांना फुलकोबीसाठी ७५ किलो एन , ७५ किलो एस यांचे मिश्रण द्यावे.
४. लागवडीनंतर १ महिन्याने ७५ किलो एन चा दुसरा डोस द्यावा.

उत्पादन –
फुलकोबीचे १०० ते २०० क्विंटल तर कोबीचे २०० ते २५० क्विंटल प्रति हेक्टरी मिळते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *