हंगामाच्या अंतिम टप्प्यात सोयाबीनने केले ७ हजार पार
हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीच्या दराची चर्चा सगळीकडे होत होती. कधी दरात वाढ तर कधी अगदी कवडीमोल दर, कधी उत्पादनात झालेली घट तर कधी शेतकऱ्यांनी केलेली साठवणूक. आता सोयाबीन अंतिम टप्प्यात असूनही सोयाबीनची चर्चा जास्त रंगात आली आहे. याचे कारण म्हणजे सोयाबीनच्या दराने ७ हजारांचा टप्पा पार केला आहे.
लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला ७ हजार ३० रुपये दर मिळत असून एका दिवसात २४ पोत्यांची आवक झाली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी आनंद पाहायला मिळत आहे.
हे ही वाचा (Read This ) एकदाच करा या पिकाची लागवड मिळेल १२ वर्ष उत्पन्न ते हे लाखात, सरकार करणार मदत
सोयाबीनच्या दरात वाढ होण्याचे कारण ?
यंदा सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली असून चक्क सर्वात जास्त सोयाबीनचे पीक घेतले जाणाऱ्या ब्राझील मध्ये देखील उत्पादनात खूप घट झाली आहे. त्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोयाबीनची मागणी वाढली आहे.
तेलाच्या दरात झालेल्या दरवाढीचा परिणाम सोयाबीनच्या दरावर झाला असल्याचा सांगण्यात येत असला तरी शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांसाठी महत्वाचे, जिप्समचा वापर केव्हा आणि कसा करावा, काय घ्यावी काळजी ?
हंगामाच्या सुरवातीच्या दराची तुलना केली तर आज सोयाबीनच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन हे ६ हजार २०० रुपयांवर स्थिरावले होते. शिवाय हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने शेतकरीही मिळेल त्या दरात विक्री करण्याच्या तयारीत होता. त्यामुळेच दर कमी असतानाही आवक वाढली होती. साठवणूक कमी करुन शेतकरी विक्रीवर भर देत होते. शेतकऱ्यांच्या या निर्णयाचाच फायदा आता त्यांना होत असतांना दिसत आहे.
हे ही वाचा (Read This ) लाल मिरचीचा ठसका, भावात जोरदार तेजी