पशुधनबाजार भाव

शेतकऱ्यांसाठी खुशखबर , गायीच्या पाठोपाठ म्हशीच्या दूध दरातही वाढ

Shares

 दुध उतपादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या महिन्यात सलग दोनवेळा गाईच्या दुधदारात वाढ झाली होती. या महिन्याच्या अगदी सुरवातीलाच  म्हशीच्या दूध देखील दरात   वाढ झाली आहे. वारणा आणि गोकुळ या संघटनेने हनिर्णय घेतला असून याची अमलबजावणी लवकरच होणार असे सांगण्यात येते. त्यामुळे म्हशीचे दूध आता  ६१  रुपये लिटर वरून थेट ६४  रुपये लिटर प्रमाणे मिळत आहे. वाढत्या उन्हामुळे म्हशीच्या दुध उत्पादनात घट झाली असून,  हा त्याचा परिणाम असल्याचे सांगण्यात येत आहे. या  दर वाढीची अंमलबजावणी मुंबईसह उर्वरीत राज्यात देखील झाली आहे.

हे ही वाचा (Read This ) ५० हजारात सुरु करा हा व्यवसाय, कमवा ५ लाख रुपये, सरकार देणार ४०% अनुदान

मुंबईत दिवसाला  १ लाख ६० हजार वारणा दुधाचा खप होतो. यामध्ये ५५  हजार लिटर दूध हे म्हशीचे तर उर्वरीत १ लाख ०५ हजार लिटर गायीचे  दुध असते. ३१ मार्च पूर्वी म्हशीचे दुध ६१ रुपये लिटर होते, यात तब्बल ३ रुपयांची वाढ होऊन आता ६४ रुपये असा दर म्हशीच्या दुधाला मिळाला असून, अनेक दिवसानंतर  म्हशीच्या दूध दरात वाढ झाली आहे. झालेली वाढ ही शेतकऱ्यांना देखील दिलासा देणारी आहे. कारण आतापर्यंत केवळ पशूखाद्यांच्या दरातच वाढ होत होती.

हे ही वाचा (Read This ) एका एकरात लागवड करा मिळवा ६ लाख रुपये, बाराही महिने करता येते लागवड

उन्हा मुळे दुधसंकलनावर परीनाम होत आहे. फक्त गोकुळचे रोजचे ६० ते ७० हजार लिटर दुधाचे संकलन हे घटले आहे.  दरवर्षी वाढत्या उन्हामुळे अशी परस्थिती निर्माण होते. असे असले तरी मुंबईमध्ये दुधाची टंचाई ही भासणार नाही. कारण ज्याप्रमाणात दुधाचे संकलन हे घटले आहे तर दुसरीकडे सुट्ट्यांमुळे अनेक नागरिक हे गावाकडे परतत असतात. त्यामुळे मागणीतही घट होणार असल्याचे गोकूळचे व्यवस्थापक दयानंद माने यांचे म्हणणे आहे.

दूध दरात 3 रुपयांची वाढ झाली असली तरी दोन महिन्यातून एकदा पशूखाद्याचे दर वाढत आहे. यंदा कापसापासून सरकी बनवण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे टंचाई भासत असल्याने दरात वाढ झाली आहे. उत्पादनावरील खर्च हा वाढत आहे. शिवाय सध्या वाढत्या उन्हामुळे दूधही कमी झाले आहे. दुधाचे उत्पादन अधिक असते तर शेतकऱ्यांना जास्तीचा फायदा झाला असता असे डेअरी चालक गणेश शेटे यांनी सांगितले आहे.

ही वाचा (Read This ) करा लाल मुळ्याची लागवड ४० दिवसात भरगोस उत्पन्न आणि नफा जास्त

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *