अखेर द्राक्ष निघाले युरोपला, निर्यातीला सुरुवात !

Shares

मागील काही महिन्यांपासून फळपिकांचे उत्पादन होईल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अतिवृष्टी, अवकाळी (Untimely Rain), यामुळे द्राक्ष (Grapes) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. द्राक्ष निर्यात (Grapes Export) करता येतील किमान तेवढे तरी द्राक्षाचे उत्पादन होईल की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना (Farmers) पडला होता. मागील महिन्यापासून शेतकऱ्यांपुढे अनेक संकटे आली मात्र शेतकऱ्यांनी सर्व संकटांचा सामना केला असून यंदा द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी वाढली आहे. युरोप सोबतच इतर अनेक देशांमध्ये द्राक्षांची निर्यात केली जात आहे. पहिल्या टप्यात १ हजार ८२७ टन द्राक्षाची निर्यात (Export) झाली असून यामध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा (Read This ) रासायनिक, जैविक, सेंद्रिय, शेतीचे अनेक प्रयोग ऐकले पण आता होमिओपॅथिक शेती

उत्पादन घटून देखील शेतकऱ्यांना मिळाला दिलासा
सततच्या बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष उत्पादनात घट झाली आहे. वाढलेल्या थंडीमुळे द्राक्षांच्या मण्यांना तडे गेले असल्यामुळे उत्पादन घेण्यासाठी झालेला खर्च देखील भरून निघतो की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. मात्र शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. द्राक्षे निर्यातीस सुरुवात झाली असून भविष्यात द्राक्ष निर्यातीमध्ये वाढ होईल अशी संभावना आहे.

हे ही वाचा (Read This ) आता सातबारा उतारा बंद? राज्य सरकारचा निर्णय

पहिल्याच टप्प्यात १ हजार टन च्या वर निर्यात
शेतमालाची निर्यात करायची असेल तर चांगल्या दर्जाच्या मालाची आवश्यकता असते. वातावरणात झालेल्या सततच्या बदलामुळे द्राक्षावर काही प्रमाणात विपरीत परिणाम झाला होता त्यामुळे यंदा द्राक्षाची निर्यात करता येईल की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. मात्र निर्यातीस सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच टप्प्यात १ हजार ८२७ टन ची निर्यात झाली असून परदेशातून द्राक्षास मागणी होत आहे. त्यामुळे शेतकरी आता द्राक्ष निर्यातीचे नियोजन तयार करत असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळणार, असा करा अर्ज

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *