शेतकरी ज्ञान व शेतीबद्दलचं विज्ञान – एकदा वाचाच

Shares

नमस्कार मंडळी,

आजच्या युगात शेतीबद्दल च ज्ञान हे संपूर्ण रासायनिक झाले आहे!या विधानाला आपली सहमती आहे का? आपन शेतीच पारंपरिक जैवतंत्र च विसरलो आहे. आपल्याला माहीत असेल नसेल आपल्या शेती मध्ये पेरणी झाल्यावर वर त्याच बरोबर पिकं उत्पादन घेताना पुजा किंवा शितादही करायचे अजुन ति परंपरा कोठे कोठे चालूच आहे. आता ही शितादही हे सर्व कशासाठी?हा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडतो. शेतकरी हा निसर्ग पुजक आहे.त्याला या गोष्टीचं सर्वच ज्ञान अवगत होतं की शेती मधे कोणते उपाय करावेत आणि काय करू नये हे या सर्वाची माहीती होती.पण काही मुसद्धी लोकांनी अज्ञानी ठरवले.मला या लेखाच्या माध्यमातून शेतीच्या पारंपरिक गोष्टी चा उलगडा करायचा आहे.

हे ही वाचा (Read This ) एका एकरात लागवड करा मिळवा ६ लाख रुपये, बाराही महिने करता येते लागवड

सितादही,रासकाढणे, पेरणी पद्धती, उन्हाळ्यात शेतीला विश्रांती देणे या सर्व गोष्टीचा विचार करणारा शेतकरी अज्ञानी कसा? एका दाण्याचे हजार दाणे करणारा व शेती उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करतो तो शेतकरीच आहेना.शेती व निसर्गाने दिलेल्या सूचना तो ओळखणारा बळीराजा आहे तो!मुद्दा नीट समजण्यासाठी शेती बद्दल जैविक तंत्रज्ञान आत्मसात करणे महत्त्वाचे आहे.मुख्य मुद्दा समजून घेऊ की शेतकरी शेतिमधे शितादही का करत असेल त्या मुख्य कारण आज आपण समजून घेऊ शितादही कश्या म्हणतात व उपयोग काय होतो हे ही समजणं महत्वाचं आहे.

हे ही वाचा (Read This या आंतरपीकामुळे मिळेल भरघोस उत्पन्न

शितादही मधे दोन पदार्थ असतात एक म्हणजे भात व दुसरं म्हणजे दही हे पदार्थ शेती उत्पादन काढणीच्या सुरवातीला भात व दही शेती मधे फेकत असतं त्याचं मुख्य कारण म्हणजे शेतकरी हा पक्षी व किटकांना आमंत्रण देत असतो. भात व साखर या मुळे पक्षी मुंग्या मधमाशा या शेता मधे येत होते व दही हे जमिनीवर पडलं की ते एक प्रकारचे बुरशीनाशक चं काम  करत हे लक्षात व शिकण्याच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे. या गोष्टी चां  परिणाम दुसऱ्या दिवशी  बघायला मिळतो.

हे ही वाचा (Read This ) कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आता वर्षभर पाण्याचे नो टेन्शन, आलंय नवीन आगळंवेगळं तंत्र

त्या मागच कारण असं वाटतं होते की एक पक्षी दाणे खायला खाली यायचा आणि जवळ जवळ शंभर गड्ड्यामध्ये कीटक, अळी हुडकुन फस्त करायचा.पक्ष्यांना आकर्षित करून कीटकनियंत्रण करणे हाच हेतू शेतकरी यांचा असायचा.आता रासायनिक शेतीच्या अज्ञानाच्या अंधारात आपन शेती मध्ये वेगवेगळे बदल आपल्या शेती पद्धती मध्ये केले. जसे की धुरावरची झाडे आपण काडुन टाकली. इथे त्यांची घरटी असायची. आणि आपले शेत शिवार ही त्यांचा साठी अन्नपूर्णा असायचे.

आपन फक्त आपला विचार केला.आतआपल्याला फक्त त्यांचा विचार करावा लागणार आहे. आपण जर ह्यांचा विचार करू शकत नसेल तर किमान त्यांचा जगण्यावर बाधा तर निर्माण होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. रसायनांचि फवारणी त्यातुन पक्ष्यांना, मधमाश्यांना होणारी विषबाधा त्यामुळे हळूहळू हे मित्र शेतीच्या रंगमंचातुणं बाद होईल   अशी भीती मला वाटत आहे…..

Save the soil all together

विचार सेंद्रिय शेती चा

मिलिंद जि गोदे

9423361185

शेती बलवान तर शेतकरी धनवान

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *