महावितरण कर्मचाऱ्यासमोरच शॉर्टसर्किटमुळे ऊसाला लागली आग
यंदा ऊसाला आग लागण्याच्या अनेक घटना समोर येत असून यामध्ये वाढ होत आहे. सर्वात जास्त ऊसाला आग ही शॉर्टसर्किट मुळे लागत असून दिवसेंदिवस या घटनेच्या संख्येत वाढ होत आहे. आता नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यताही धामणगाव येथे ४ एकरातील ऊस जाळून राख झाला आहे. आता ऊस तोडणीत असताना अश्या घटना घडत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
सिन्नर हायवे लगतच गाढवे यांचा ऊसाचा फड असून शॉर्टसर्किटमुळे शेतात आग लागली. आगीची घटना निदर्शनास येताच मार्गस्त होणाऱ्या नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचे शक्य तेवढे प्रयत्न केले. परंतु वाढते ऊन आणि वाऱ्यामुळे अगदी काही वेळातच ४ एकरातील फडातील ऊसाला आग लागली असून हा सर्व प्रकार महावितरण कर्मचारीच्या डोळ्यासमोरच घडला आहे.
ही वाचा (Read This ) PM-SYM : शेतकऱ्यांसाठीची काय आहे पेन्शन योजना, कसा करावा अर्ज?
महावितरण कर्मचाऱ्यांसमोरच शॉर्टसर्किट …
विद्युत पुरवठा सुऱळीच व्हावा शिवाय विद्युत वाहिन्यांमुळे शेती पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून वीज मंडळाचे कर्मचारी लाईन पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान लाईन फॉल्टी झाल्याने शॉर्टसर्किटची घटना घडली आहे. सतत घडणाऱ्या घटनेमुळे सुविधांपेक्षा अडचणीच अधिक झाल्याची शेतकऱ्यांची भावना झाली आहे. शेतकरी त्वरीत नुकसान भरपाई देण्याची मागणी करत आहेत.
ही वाचा (Read This ) शेळीपालन आणि कुक्कुटपालन साठी मिळणार 50 लाख रुपये अनुदान
सुविधांपेक्षा अडचणी अधिक, नुकसान भरपाईची मागणी
मराठवाड्यासह आता पश्चिम महाराष्ट्र्रात देखील या घटना अधिक संख्येने घडत आहेत. महावितरणकडून वेळोवेळी दुरुस्तीची कामे होत नसल्यामुळे अश्या घटना घडण्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ऊस तोडणीत असताना अश्या घटना घडत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण आणि नुकसान भरपाई कोण देणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.
हे ही वाचा (Read This ) शेतकरी मित्रांनो, SHCS या योजनेचा आपण लाभ घेतला आहे का ?