इतर बातम्या

शेतकऱ्यांचा दुष्काळात तेरावा महिना, ५ दिवस कांदा विक्री करता येणार नाही

Shares

पाच दिवस बाजार समितीत व्यवहार बंद राहणार असल्याने कांद्याची आवक वाढली आहे. त्यात उन्हाळी कांद्याचे दर देखील मोठया प्रमाणात घटले आहे.
बाजारपेठेत वाढती आवक बघता कांदा उत्पादक शेतकरी काढलेल्या कांदा थेट बाजारपेठेत घेऊन जाण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.

वाढत्या उष्णतेचा फटका कांदा साठवून ठेवणाऱ्याना बसू शकतो, यामुळे यामुळे दर कमी असतानाही शेतकऱ्यांनी कांदा विक्रीवर भर दिला आहे. पण आता शेतकऱ्यांना पाच दिवस कांदाच विकता येणार नाही. कारण मार्च एंडिंग, सण आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे लासलगाव आणि पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितसह जिल्ह्यातील १७ बाजार समित्यांमधील लिलाव बंद राहणार आहेत. कांद्याबरोबरच धान्याचेही व्यवहार बंद असल्याने कोट्यावधींची उलाढाल ही ठप्प राहणार आहे. सध्या उन्हाळी कांद्यासह रब्बी हंगामातील हरभरा, सोयाबीन आणि तुरीची मोठ्या प्रमाणात आवक सुरु होती. पण आता सलग पाच दिवस शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

हे ही वाचा (Read This ) या पिकाची शेती करून दीड ते दोन वर्षात ६ लाख रुपये कमवा

पाच दिवसानंतर कांद्याचे भाव काय राहणार ?

मागील एका महिन्यात कांद्याचे दर अनपेक्षित घसरले आहे. यापूर्वी खरिपातील लाल कांद्याची आवक सुरु असताना कांद्याला मागणीही आणि दरही चांगला होता. मात्र, आता उन्हाळी कांद्याची आवक सुरु झाली आहे. सध्या ३ हजार रुपये क्विंटल भाव असणारा कांदा चक्क १ हजार रुपये क्विंटल झाला आहे. राज्यात लासलगाव, सोलापूर, पिंपळगाव या मुख्य बाजार समित्या आहेत, यात अशी अवस्था आहे. चांगल्या प्रतीच्या कांद्याला १ हजार तर सर्वसाधारण दर हा ८०० रुपयांपर्यंत आहे.

हे ही वाचा (Read This ) शेळीपालन,कुक्कुटपालन,शेतमाल आदीसाठी ६०% अनुदान, असा करा अर्ज ३१ मार्चपूर्वी

तसेच आता सलग ५ दिवस लिलाव बंद राहूनही दरावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. कारण सध्या कांद्याची मागणी कमी आहे. त्यामुळे दर वाढतील असे नाही पण बाजार समितीमध्ये दाखल झालेल्या कांद्याचे नियोजन करण्यासाठी बाजार समिती प्रशासनाला वेळ मिळणार आहे.

हे ही वाचा (Read This )  कमीत कमी पाण्यात करा या पिकाची लागवड, मिळवा भरगोस उत्पन्न

शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

मार्च महिना संपत आलाय तरी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यात नवीन उन्हाळी कांदा बाजारात आलाय. कांद्याच्या बाजारभावात दररोज घसरण होत कांद्याचे बाजार भाव एक हजार रुपयांच्या आत आले असून सर्वसाधारण ८०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल कांद्याला बाजार भाव मिळत आहे.

मार्च अखेर, सण आणि साप्ताहिक सुट्ट्या निमित्त बँकेतून पैसा मिळणार नसल्याने लासलगाव व पिंपळगाव बाजार समितीसह जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा व धान्यचे लिलावाचे कामकाज बंद राहणार आहेत.त्यात शेतकऱ्यांनी कमी भावात देखील कांद्याची विक्री सुरू केली आहे, यामुळे यावर्षी शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.

हे ही वाचा (Read This ) असा काढा घरी बसून जमिनीचा ऑनलाईन नकाशा, महाभूमी अभिलेख

शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान

नाशिक जिल्ह्यात लासलगाव, पिंपळगाव या बाजार समित्या कांद्याच्या मुख्य बाजारपेठ आहेत. दिवसाकाठी ४०० ते ५०० वाहनांतून कांदा या बाजार समित्यांमध्ये दाखल होतो. नाशिक जिल्ह्यातील १७ बाजार समित्यांमधील व्यवहार पाच दिवस बंद राहणार आहे. सध्या रब्बी हंगामातील हरभरा, सोयाबीन आणि तुरीची आवक होत असताना या बाजार समित्या बंद राहणार आहेत.

हे ही वाचा (Read This ) कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आता वर्षभर पाण्याचे नो टेन्शन, आलंय नवीन आगळंवेगळं तंत्र

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *