रब्बी पिकांवर पावसाचे दृष्टचक्र ! पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान
अतिवृष्टी , अनियमित पावसामुळे खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. जवळजवळ सर्वच पिके पाण्याखाली गेले आहे. खरिपातील केवळ कापूस, तूर ही दोनच पिके शेतामध्ये दिसून येत आहेत. त्यातही अवकाळी पावसामुळे उत्पादन हे अत्यंत कमी मिळाले आहे. मराठवाड्यात तुरीची काढणी सुरु असतानाच झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे तर कापसाची बोंडे भिजल्याने हातातोंडाशी आलेला घास पुन्हा निसर्गाने हिसाकावून घेतलेला आहे. खरीप हंगामात सुरु झालेले संकट अजूनही संपलेले नाही, असे म्हणता येईल.
पावसामुळे कापसाचे नियोजन पाण्यात …
गेल्या काही दिवसांपासून कापसाच्या दरात घट होत होती मात्र आता कापसाला विक्रमी भाव मिळाला आहे. याचे कारण शेतकऱ्यांनी साठवणूक करून ठेवलेला कापूस आहे असे म्हणण्यास हरकत नाही. अचानक झालेल्या पावसामुळे हा साठवलेला कापूस भिजला आहे शेतकऱ्यांनी कापसाचे अगदी योग्य असे नियोजन केले होते. मात्र निसर्गापुढे कोणाचीही चालत नाही. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नियोजन पाण्यात गेलेले दिसून येत आहे. या अवकाळीचा सर्वात जास्त फटका खरीप हंगामातील पिकांना बसलेला असून आता रब्बी पिकास काही प्रमाणात बसण्याचा अंदाज आहे.
पावसाने केले तुरीचे नुकसान …
खरीप हंगामातील मुख्य आंतरपीक म्हणून घेतले जाणाऱ्या तुरीचे पीक सुरवातीला बहारात असल्यामुळे त्यावर पावसाचा परिणाम झाला नाही. मात्र अवकाळी पावसामुळे त्यावर ही आता दृष्टचक्र सुरु झाल्याचे दिसून येत आहे. अवकाळी पडलेल्या पावसामुळे तूर पिकावर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला तर शेंगा पोसल्याच नाहीत. त्यामुळे खरिपातील पीक शेजाऱ्यांच्या पदरी पडलेच नऊ.
ढगाळ वातावरणाचा पिकांवर परिणाम …
अवकाळी पावसाचा परिणाम खरिपातील पिके, फळबाग तसेच काही प्रमाणात रब्बी पिकांवर झाला आहे. पिकांचे जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या संपूर्ण राज्यामध्ये ढगाळ वातावरण निर्नाम झाले आहे. त्यामुळे हरभरा पिकांवर घाटीअळीचा प्रादुर्भाव वाढणार आहे असे निदर्शनास येत आहे. शेतकऱ्यांनी ५ % निंबोळी अर्क , प्रति एकरी २ कामगंध सापळे, २० पक्षा थांबे बसवावे आणि जर या अळीचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास इमामेक्टीन बेंझोएट 5 टक्के 4 ग्रॅम क्विनॅालफास १० लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करावी असे कृषीतज्ञांनी सांगितले आहे.
हे ही वाचा.