इतर बातम्या

कापसाच्या दरात दुसऱ्यादिवशीही वाढ !

Shares

हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीन प्रमाणे कापसाच्या दरात देखील जास्त संख्येने घसरण होतांना दिसून येत होते. त्यामुळे कापूस उत्पादकांनी कापसाची साठवणूक करण्यावर जास्त जोर दिला होता. शेतकऱ्यांच्या या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांना होतांना दिसून येत आहे.सतत कापसाच्या दरात घसरण होत होती त्यामुळे शेतकरी संकटात सापडला होता. मात्र आता कापसाला सध्या मिळलेल्या दरामुळे शेतकरी सुखावला आहे. बाजार समितीमध्ये कापसाला चांगला भाव मिळाला आहे. तसेच कापूस खरेदी केंद्रावर गर्दी दिसू लागली आहे. कापसाच्या दरात आता अजून वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे. सुरवातीला कापसाचे दर चांगले होते. नंतर या दरात घसरण होऊन हे दर थेट ७ हजारावर येऊन थांबले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस साठवणुकीवर भर दिला होता. आता मात्र नंदुरबारबाजार समितीमध्ये कापसाला ९ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. आता या दरात अजून वाढ होऊन सध्या दर ९ हजार ५० रुपये झाला आहे.

२ दिवसातच कापूसला विक्रमी दर
शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारण शेतमालाच्या दरावर अवलंबून आहे. सुरवातीस कापसास ८ हजार ५०० ते ९ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. त्यानंतर या दरात घट होऊन थेट ६ हजार ते ७ हजार वर येऊन पोचला होता. मात्र २ दिवसांपूर्वी कापसाचे दर ९ हजार प्रति क्विंटल झाले होते. आता हे दर ९ हजार ५० रुपये झाले आहे. कापसाच्या मागणीत वाढ झाल्यास त्याच्या दरात अधिक वाढ होण्याचा अंदाज दर्शविला जात आहे.

कापसाचा वाढला वापर
यंदा कापूस उत्पादनाच्या क्षेत्रात घट होतांना दिसून येत आहे तर आता पुन्हा अवकाळी पाऊस पडला आहे. या अवकाळी पाऊस, गारपीठ मुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव होतांना दिसून येत आहे. असे असले तरी कापसाची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सूतगिरण्या , कापड उद्योगात कापसाची मागणी अजून जास्त प्रमाणात वाढतांना दिसून येत आहे.

ओमिक्रोनचा कापसावरील परिणाम
ओमिक्रोनचा वाढत प्रादुर्भाव पाहता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापसाच्या मागणीत घट झाली होती. याचा परिणाम सूतगिरण्यांवरही झाला होता. सूतगिरण्यांनी त्यांची उत्पादन क्षमता कमी केली होती. त्यामुळे मागणीत देखील घट झाली होती. याचा मोठा परिणाम कापसाच्या दरावर झाला होता. आता कापसाची मागणी वाढली असून कापसाच्या दरात तब्बल १ हजार ५०० रुपायांनीं वाढ झाली आहे. पुढे मागणी अशीच राहिली तर दरात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.

भाजीपाला निर्यात करण्यासाठी आवश्यक आहेत ही कागदपत्रे ! हे ही वाचा.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *