कापसावरील रस शोषती कीड, बोंडअळीचाही धोका; फूलकिड्यांचे आक्रमण, जाणून घ्या नियंत्रण पद्धती

Shares
कपाशीला जपा: नाहीतर कीड शोषतील रस, बोंडअळीचाही धोका; फूलकिड्यांचेही पिकावर होऊ शकते आक्रमण, जाणून घ्या संपूर्ण नियंत्रण पद्धती

कापूस पिकावर सुरुवातीच्या काळात प्रामुख्याने मावा, तुडतुडे आणि फुलकिडे या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव होतो. तुडतुड्यांचा प्रादुर्भाव जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून व फूलकिड्यांचा प्रादुर्भाव ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून आढळतो. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव डोमकळ्यांच्या स्वरुपात ऑगस्ट महिन्यात दिसून येतो. सर्व प्रकारच्या किडींमुळे कपाशीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनो, कपाशीला जपा; नाही तर किडी शोषतील रस, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला.

गव्हाच्या किमती गगनाला भिडल्याने सरकारची चिंता वाढली, सरकार आयात शुल्क रद्द करणार !

रसशोषक किडीसाठी कपाशीचे पिकाचे प्रादुर्भावाबाबत सर्वेक्षण करावे. सरासरी संख्या १० मावा / पान किंवा २ ते ३ तुडतुडे / पान किंवा दहा फूलकिडे / पान किंवा मावा, तुडतुडे आणि फूलकिडे यांची एकत्रित सरासरी संख्या दहा/ पान किंवा त्यापेक्षा जास्त आढळून आल्यास नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा. गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक आठवड्याला एकरी शेताचे प्रतिनिधित्व करतील, अशी २० झाडे निवडून निवडलेल्या प्रत्येक झाडावरील फुले, पात्या व बोंडे संख्या मोजून त्यात गुलाबी बोंड अळीग्रस्त फुले, पात्या व बोंडे यांची टक्केवारी काढावी व प्रादुर्भावग्रस्ताची टक्केवारी ५ टक्केपेक्षा जास्त आढळल्यास फवारणी करावी.

क्विनोआ फार्मिंग: बाजारात पोषक धान्य क्विनोआची मागणी वाढत आहे, कमी कष्टात मिळवा मोठा नफा

रसशोषक अळीसाठी हे फवारा

बुप्रोफेजीन २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा डॉयफेथ्युरॉन ५० टक्के पा. मि. भुकटी १२ ग्रॅम किंवा फिप्रोनिल ५ टक्के प्रवाही ३० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के २.५ मिली यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

गुलाबी बोंडअळीसाठी हे फवारा

प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही ३० मिलि किवा क्लोरेंट्रानिलीप्रोल १८.५ टक्के एससी ३ मिली किंवा थायोडिकार्ब ७५ टक्के भुकटी २० ग्रॅम किंवा फिप्रोनील ५ टक्के एससी ३० मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के ईसी १२ मिली या पैकी कोणतेही एक कीटकनाशक प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

शेळीपालन:या जातीची शेळी आना कमी खर्चात जास्त नफा मिळवा, 11 महिन्यांत देते 3 ते 5 पिल्लाना जन्म

असे ठेवा, पीक तणविरहीत

उगवणीनंतर आठ ते दहा दिवसांनंतर पिकामध्ये पिवळे चिकट सापळे हेक्टरी २५ लावून नियमित पांढरी माशीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवावे. कपाशीत चवळीचे आंतर पीक घ्यावे. चवळीवर कपाशीवरील किडीच्या नैसर्गिक शत्रू कीटकांचे पोषण होईल. वेळेवर आंतरमशागत करून पीक तणविरहीत ठेवावे. त्यामुळे किडीच्या पर्यायी खाद्य तणांचा नाश होईल. बांधावरील किडींचे पर्यायी खाद्य आंबाडी, रानभेंडी नष्ट करावी.

महागाईनुसार शेतकरी कुटुंबांचे सरासरी मासिक उत्पन्न किती असावे? केंद्राचे गणित काय ते वाचा

पीएम किसान:पुन्हा एकदा eKYCची अंतिम तारीख वाढवली

आजपासून IIT JEE Advanced 2022 ची नोंदणी सुरु, असा करा अर्ज

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *