इतर बातम्या

बाजारात सोयाबीन बरोबर तूरीचीही आवक सुरु !

Shares

काही दिवसांपासून सोयाबीनच्या दराची चर्चा सगळीकडे सुरु होती. सोयाबीनच्या दरात ३-४ दिवसापासून घसरण होत होती. परंतु आता मात्र सोयाबीनच्या दरात स्थिरता दिसून येत आहे. परंतु खरिपातील तुरीचे आवक सुरु झाले आहे. तुरीस मुबलक असा भाव मिळत नसल्याने तुरीची आवक काही प्रमाणातच झाली आहे. खरे पाहता हा आठवडा शेतकऱ्यांसाठी धाकधुकीचा होता. आता सोयाबीन बरोबर तूरीचीही आवक वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.अजूनही सोयाबीनच्या दर वाढीची खात्री नसल्यामुळे शेतकरी सोयाबीनच्या विक्रीवर साठवणुकीपेक्षा जास्त भर देत आहेत.
खरीप हंगामातील शेवटचे पीक असणाऱ्या तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी काढणी जोमाने करत असून जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. शुक्रवारी तुरीची आवक झाली तेव्हा दर ६ हजार २०० रुपये असा असून केंद्र सरकारने ६ हजार ३०० रुपये हमीभाव घोषित केला होता. परंतु अजूनही हमीभाव केंद्र सुरु झालेले नाही. शेतकरी पूर्ण हंगाम सुरु होण्यापूर्वी केंद्र सुरु करा अशी मागणी करत आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *