कॉन्ट्रॅक्ट (करार) फार्मिंग काय आहे ?

Shares

दिवसेंदिवस जागतिक बाजारपेठेबरोबर शेती क्षेत्रात देखील आमूलाग्र बदल होतांना दिसून येत आहे. भारताची ६०% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. शेती निसर्गावर अवलंबून असल्यामुळे शेतीचे नियोजन अनेकदा चुकत असते. सध्या शेतीकडे एक व्यवसायाच्या दृष्टीकोनातून पहिले जात असले तरी आजही कित्तेक गोष्टी शेतकऱ्यांच्या आवाक्यात नाही. शेती व्यवसायात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे शेती पद्धतीमध्ये काही बदल करण्यात आले असून नवीन पद्धतीचा अवलंब केला जात आहे. अश्याच एका करार शेतीची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

काय आहे करार शेती ?
ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादकांकडून उत्पादन तयार करून घेण्यासाठी संस्था, कंपनी, मध्यस्थी शेतकऱ्यांसोबत करार करतो, यालाच करार शेती म्हणतात. करार शेतीमध्ये ग्राहक आणि ग्राहकाच्या पसंतीस जास्त महत्व दिले जाते. गेल्या १५ ते २० वर्षांपासून पंजाब राज्यात करार शेती केली जाते.

कशी करता येईल करार शेती ?
पूर्वी सरकारी , खाजगी कंपन्या बीजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून बियाणे उत्पादित करत होते. साधारणतः बियाणे खरेदी करणारे शेतकरीच असतात. त्यास नजरेसमोर ठेवून गरजेनुसार बियाण्यांचे उत्पादन घेतले जाते. यानंतर बियाण्यांनावर प्रक्रिया करून त्यांचा पुरवठा करण्यात येतो. सुरवातीस बियाणांवर प्रक्रिया करून ते पुढे पाठण्यात येते. त्यानंतर ते ग्राहकांपर्यंत पोचवण्यात येते. सुरवातीस अनेक ग्राहकांनी हे स्वीकारले होते. मात्र यानंतर जागतिक बाजारपेठेत इतर देशातून येणाऱ्या मालाबरोबर ग्राहक तुलना करू लागला. ग्राहक जागरूक असल्यामुळे त्यांच्या पसंती मागणी मध्ये बदल होत गेले. त्यानंतर ग्राहकांची गरज, ग्राहकांची मागणी यावर जास्त भर देण्यात आला. विखुरलेल्या शेतकरी पेक्षा एकत्रित गट करून व्यवहार करणे जास्त सोपे जाते असे निदर्शनात आले.यामध्ये सर्व घटकांचा एकमेकांशी करार असतो. उदाहरणच घ्यायचे झाले तर शेती मधून निघणारा माल शेतकरी कंपनीला देईल तसेच कंपनीने ठरवून दिलेल्या गुणप्रतीनुसार मालतयार झाला तर ठरवून दिलेल्या किमतीला विकत घेईल.तसेच उत्पादन घेण्यासाठी लागणारा अर्थपुरवठा आणि केलेला अर्थपुरवठा परत करण्याची हमी कंपनी अर्थपुरवठा करणाऱ्या संस्था व शेतकऱ्यांना देईल असे एकंदरीत याचे स्वरूप असते. शेती व्यवसाय तुलनेने अनियमित असतो. शेती मालाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे कर्ज फेडणे शक्य व्हावे यासाठी अनेक वेळा विमा कंपन्यांनाही या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतले जातात.

शेतीमधील उत्पादन काढण्यासाठी एकत्रित येऊन एकमेकांशी केलेला करार म्हणजेच करार शेती असे म्हणता येईल.

हे ही वाचा.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *