Summer Special: उन्हाळ्यात अति थंड पाणी पिण्याचे टाळावेत, माठातील पाणी पिणे अधिक फायद्याचे
दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे तुम्ही जर अतिथंड पाणी पीत असाल तर वेळीच सावध व्हा.
उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी अनेक लोक थंड पाण्याचे सेवन करतात. मात्र या थंड पाण्यासह थंड पेयाचा शरीरावर विपरीत असा परिणाम होतो. त्यामुळे पचनसंबंधित अनेक विकार होतात. थंड पाणी पितांना चांगले वाटते मात्र त्याचे अनेक वाईट परिणाम आहेत.
हे ही वाचा (Read This) Summer Special : शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी प्या नारळपाणी
उन्हाळ्याच्या काळात आपल्या शरीराचे तापमान साधारणपणे 36 अंश सेल्सिअसच्या आसपास असते. वातावरणातील तापमानानुसार ते बदलते. शरीराच्या सर्व यंत्रणा शरीराच्या तापमानात अचानक बदल झाल्यामुळे प्रतिक्रिया देऊ लागतात.आज आपण या बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
हे ही वाचा (Read This) Summer Special : घामोळ्यांचा त्रास होत असेल तर करा हे उपाय
- उन्हाळ्यामध्ये अतिथंड पाणी पिल्यामुळे शरीराची पचनसंस्था संथ शकते.यामुळे अनेक पोटासंबंधित आजार निर्माण होऊ शकतात
- कधीकधी पचनासाठी आवश्यक एन्झाईम्सचे उत्पादन आणि नसा, रक्तवाहिन्या संबंधित अवयवांचे कार्य व्यवस्थित काम करत नाही.
- पाण्याची कमी तापमानाचा थेट परिणाम व्हॅगस नेव्हवर होत असल्याने पाण्याचा शरीराच्या अनेक भागांवर परिणाम होतो. ही एक गंभीर समस्या असू शकते
- थंड पाण्यामुळे हृदय गती कमी होते. त्यामुळे इतर समस्या देखील उध्दभवण्याची शक्यता असते.
- उन्हातून आल्यावर लगेच फ्रीजमधील पाणी पिणे टाळावे. यामुळे उष्माघात होऊ शकतो. यामुळे अनेक लोकांना आपला जीवसुद्धा गमवावा लागला आहे.
थंड पाणी प्यावे वाटले तर फ्रिज मधील पाण्याऐवजी माठातील पाणी पाणी पिणे अधिक फायद्याचे. मातीच्या भांड्यात पाण्याच्या बाष्पीभवन सिद्धांतानुसार, नैसर्गिक प्रकारे पाणी थंड राहते. फ्रिजच्या पाण्याने अनेक प्रकारचे नुकसान होते, इम्यूनिटी सुद्धा कमज़ोर होते. यासाठी जाणून घेवूयात मडक्यातील पाणी पिण्याचे कोण-कोणते फायदे आहेत.
हे ही वाचा (Read This) summer special : उष्मघातापासून संरक्षण करणारे कैरीचे आरोग्यदायी पन्हे
- माठातील पाणी अतिथंड नसते यामुळे पचन व्यवस्थित होते. नियमित प्यायल्याने पोटदुखी, गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्या दूर राहतात.
- मातीत विषारी पदार्थ शोषण्याची शक्ती आहे. माठातील पाणी प्यायल्याने सर्व सुक्षम पोषकतत्व मिळतात.
- अंगदुखी, सूज आणि जखडण्यापासून आराम मिळतो. अर्थरायटिसच्या आजारात अतिशय लाभदायक आहे.
- मातीच्या भांड्यात पाणी थंड करून प्यायल्याने इम्यून सिस्टम ठिक राहते. मडक्यात पाणी स्टोअर केल्याने शरीरात टेस्टोस्टेरोन हार्मोनचा स्तर वाढतो.
हेही वाचा :बँकेच्या वेळा बदलल्या, RBI चा मोठा निर्णय