इतर बातम्याबाजार भाव

आठवड्याच्या सुरुवातीलाच सोयाबीनला ७ हजार ४०० चा दर

Shares

सोयाबीनच्या दरामध्ये सतत चढ उतार सुरु असून शेतकरी प्रश्नात पडला आहे. मध्यंतरी सोयाबीनच्या दरात ४०० रुपयांनी वाढ झाली होती. तर नंतर १५० रुपयांनी घसरण झाली होती.

सोयाबीनच्या दरामध्ये अनेकदा वाढ होऊन देखील आवक मात्र स्थिरच होती. आता मात्र मोठ्या प्रमाणात आवक होतानाचे चित्र दिसत आहे. मागील १५ दिवसात सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होत आहे तर याचा परिणाम आता सोयाबीनच्या आवक वर होतांना दिसून येत आहे.

हे ही वाचा (Read This) रेशीम शेती उत्पादकांसाठी आनंदाची बातमी, या विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी समृद्ध होणार

सोयाबीनचे आजचे दर

soybean bhav

सोयाबीनच्या दरात स्थिरता ..

मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरामध्ये सतत चढ उतार होत आहे. मात्र आता सोयाबीनचे दर हे ७ हजार ३०० ते ७ हजार ४०० वर स्थिर झाले आहेत. एवढेच काय तर सध्या सोयाबीनच्या अवकमध्ये वाढ होऊन देखील दर हे स्थिरच आहेत. बाजारपेठेमध्ये सोयाबीनची मागणी वाढल्यामुळे इतक्या दिवसापासून साठवणूक करून ठेवलेला सोयाबीन आता बाजारामध्ये दाखल होत आहे.

शेतकऱ्यांना सोयाबीनच्या वाढीव दराची अपेक्षा आहे. मात्र सध्या दर स्थिर असल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीचा वेग थोडा वाढवला आहे.

सोयाबीनच्या दरात वाढ होताच आवक दुप्पट…

सुरुवातीला सोयाबीनला ५ हजार रुपये दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणुकीवर जास्त भर दिला होता. तर टप्याटप्याने सोयाबीनची आवक सुरु होती. मात्र सोयाबीनच्या दरात वाढ होताच आवक दुपटीने सुरु झाली होती.

सोयाबीनच्या दरामध्ये आठवड्याच्या पहिल्या दिवशी अचानक ४०० रुपयांची वाढ झाली होती. तेव्हा अचानकपणे दर वाढल्यामुळे १५ ते १८ हजार पोत्यांची आवक ही थेट ३० हजार पोत्यांवर पोहचली होती

हे ही वाचा (Read This) नाबार्ड डेअरी योजना, ५० टक्के अनुदान

सूर्यफूल ६ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल

सध्या खाद्यतेलाच्या दरामध्ये वाढ झाली असून सूर्यफूल दर तर ६ हजार ७०० वर गेले आहे. अनेक शेतकऱ्यांनी पीक पद्धतीमध्ये बदल व्हावा म्हणून कढधान्य पिकांवर जास्त जोर दिला होता. आता याचा फायदा शेतकऱ्यांना होतांना दिसत आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *