गांडूळखत निर्मितीचे तंत्र व शेतीसाठी होणारे फायदे

Shares

नमस्कार मंडळी,

पुन्हा एकदा आपल्या सेवेत मी मिलिंद जि गोदे घेऊ आलोय गांडूळखत निर्मितीचे तंत्र व शेतीसाठी होणारें फायदे.

जमिनीचा सुपीक थर तयार होण्यासाठी गांडुळाचे महत्त्वाचे कार्य आहे. गांडुळाच्या शरीरामध्ये प्रोटोलायटीक, सेल्युलो लाटकीक आणि लिग्नो लायटीक एन्झाईम्स असतात .या एन्झाईम्समुळे सेंद्रिय पदार्थांचे विघटन होऊन साध्या सेंद्रिय पदार्थांतील सहजीवी जीवाणू व अॅक्टीनोमायसीटीस बुरशी मुळे लिगनीनयुक्त सहसा लवकर न कुजणार्‍या पदार्थांचे अन्नद्रवीकरण होते.

गांडूळ ह्या प्राण्याचा अॅनिलिडा समूहात व ओलिगोचीटा वर्गात समावेश होतो. आपल्या शेतीसाठी गांडूळ नवीन नाहीत. मराठीत गांडूळ,दानवे वाळे, शिदोड अथवा केंचवे या नावाने ओळखल्या जाणार्‍या या प्राण्याला इंग्रजीत ‘अर्थवर्म’ असे नाव आहे.
शेतीमधील विषारी किटकनाशकांच्या व रासायनिक खतांच्या वापरामुळे उत्पादन खर्चात वाढ तर होतेच परंतु पर्यावरणावर दुष्परिणामही होतो. त्यामुळे जगातील बरेच देश गांडूळांचा वापर करीत आहेत.

आज ठिकठिकाणी चाललेल्या प्रयोगाद्वारे निसर्गशेतीची संकल्पना आज काही प्रमाणात रुजत चालली आहे. त्यात गांडूळ शेतीचा वापर,पालापाचोळा, शेतातील काडी कचरा व जनावरांचे मलमुत्र इ. सेंद्रिय पदार्थाचा वापर करून गांडूळखत बागेत, शेतातअथवा कोणत्याही जागेत तयार करू शकतो. त्यासाठी गांडूळांची शास्त्रशुद्ध माहिती असणे गरजेचे आहे.

हे ही वाचा (Read This) शेतीसाठी हे औषध एक उपाय अनेक !

गांडूळ हा नाजूक गुळगुळीत, लवचीक शरीर असलेला भूचर असून तो २ इंचापासून दोन फुटापर्यंत लांब असून त्याचे वजन ०.५ ग्रॅम पासून १० ग्रॅमपर्यंत असून शकते. हा रंगाने तांबूस, तपकिरी, लालसर किंवा पांढरट असतो. त्याला हवे ते वातावरण मिळाले की, तो अविश्रांत कार्य करीत असतो.
शेण हे गांडूळांचे आवडते खाद्य असून शेणाबरोबर शेतातील काडीकचरा अथवा पालापाचोळा थोडी प्रक्रिया करून दिला तर ते गांडूळांचे उत्तम खाद्य ठरते.
जगात गांडूळांच्या ३०० हून अधिक जाती असल्या तरी त्यांचे मुख्यत: दोन गटांमध्ये वर्गीकरण केले जाते.

  • जमिनीच्या पृष्ठभागावर कचर्‍यात राहून कचरा खाणारी गांडुळे, ह्यांचा वाढीचा व उत्पत्तीचा वेग जास्त असल्यामुळे यांचा वापर मुख्यत: गांडूळखत तयार करण्यासाठी केला जातो. ह्या प्रकारामध्ये मुखत: आयसोनीया फीटीडा, युड्रीलस युजेनिया, पेरीनोक्सी, एक्झोव्हेटस, फेरीटीमा इलोंगेटा इ. समावेश आहे.
  • दुसर्‍या प्रकराची गांडुळे जमिनीत खोलवर बिळे तयार करतात. त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते. ही गांडुळे जास्त प्रमाणात माती खातात व सेंद्रिय पदार्थ खाण्याचे प्रमाण फार कमी असते. जमिनीमध्ये योग्य वातावरण निर्माण केल्यास ही गांडूळे शेतजमिनीत आपोआप तयार होतात.अर्धवट कुजलेला शेतातील जैविक विघटनशील काडीकचरा, पालापाचोळा, टाकाऊ सेंद्रिय पदार्थ तसेच कुजलेले शेण इत्यादी पदार्थ कुजविण्यासाठी गांडुळांचा उपयोग केला असता ते पदार्थांचे तुकडे खाऊन करतात. त्यांचे पचन करून कणीदार कातीच्या स्वरूपात शरीराबाहेर टाकतातत्यालाच ‘गांडुळखत’ असे म्हणतात.

हे ही वाचा (Read This) आपलं शेती मध्ये कुठंतरी चुकतंय!

गांडूळ खतांचे शेतीसाठी फायदे

  • गांडुळांमुळे जमिनीचा पोत सुधारतो.
  • मातीच्या कणांचा रचणेत उपयुक्त बदल घडविला जातो.
  • गांडुळांची विष्ठा म्हणजे एक उत्तम प्रकारचे खत आहे याला ‘ह्युमस’ म्हणतात. यातून झाडाच्या वाढीसाठी लागणारे नायट्रोजन, फॉस्फरस,पोटॅशियम व बाकीचे सूक्ष्म अन्नद्रव्ये झाडांना सहजासहजी व ताबडतोब उपलब्ध होतात.
  • मुळ्या अथवा झाडांना इज न होता जमिनीची नैसर्गिक मशागत केली जाते. त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहून मुळांची वाढ चांगली होते.
  • जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
  • जमिनीची घूप कमी होते.
  • पाण्याचे बाष्पीभवन फारच कमी होते.
  • जमिनीचा सामू योग्य पातळीत राखला जातो.
  • गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवितात.
  • उपयुक्त जिवाणूंच्या संख्येमध्ये भरमसाठ वाढ होऊन वरखते आणि पाण्याच्या खर्चात बचत होते.
  • झाडांची निरोगी वाढ होऊन किडींना व रोगांना प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होते.
  • फळांमध्ये टिकावूपणा व चव येऊन त्यांना पक्वता लवकर येण्याचे प्रमाण वाढते. अशाप्रकारे गांडूळ नापीक जमीनसुद्धा सुपीक बनविण्याचे कार्य करते.

Mission agriculture soil information
विचारांची दीशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल

Milind j gode
milindgode111@gmail.com

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *