सूर्यफुलाची शेती करताय, मग जाणून घ्या या महत्वाच्या बाबी

Shares

फुलशेती मध्ये सूर्यफुलाची शेती अनेक शेतकरी करतात. सूर्यफुलाची लागवड करतांना अनेक बाबींची काळजी घ्यावी लागते. तर त्या बाबी नेमक्या कोणत्या याची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.

१. कृत्रिम परागीभवन व्हावे यासाठी पीक फुलोऱ्यात असताना सकाळी ७ ते ११ या वेळेत हाताला तलम कापड गुंडाळून फुलांच्या तबकावरून हळुवारपणे हाथ फिरवावा त्यामुळे दाणे भरण्याचे प्रमाण देखील वाढते.
२. सूर्यफुलाचे फुल उमलण्याच्या अवस्थेत असताना तसेच फुल उमलल्या नंतर ८ दिवसांनी प्रति लिटर पाण्यात २ ग्रॅम बोरॅक्स मिसळून फवारणी करावी.
३. प्रति हेक्टरी ४ ते ५ मधमाश्याच्या पेट्या ठेवाव्यात जेणेकरून परागीभवन होईल.
४. सूर्यफूल पिकाची फेरपालट करत राहावी.
५. सूर्यफुलाची मुले ही खोलवर जास्त असतात त्यामुळे सतत सूर्यफुलाचे पीक घेतल्यास जमिनीचा पॉट बिघडून उत्पादन कमी येते.
६. कमीत कमी ३ वर्षे सूर्यफुलाचे पीक घेऊ नये जेणेकरून रोग व किडीचा प्रादुर्भाव होणार नाही.
७. कडधान्य सूर्यफूल तर तृणधान्य सूर्यफूल अश्याप्रकारे पिकाची फेरपालट करावी.
८. अगदीच आवश्यकता असल्याशिवाय पीक फुलोऱ्यात असतांना कीटकनाशकाची फवारणी करावी . शक्यतो फवारणी टाळावी.
९. सूर्यफुलाची लागवड करतांना हेक्टरी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत घालावेत.

सूर्यफूल लागवड करतांना थोडी योग्य काळजी घेतल्यास उत्पादन वाढ होऊन त्यातून चांगले उत्पन्न मिळण्यास मदत होते.

Shares