एका पिकावर अवलंबून न राहता या पठ्याने २० गुंठ्यात हे पीक घेत कमवतोय हजारों रुपये

Shares

अनेक शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत शेती व्यवसायमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. असाच एक प्रयोग जालना तालुक्यातील एका तरुणाने केला आहे. त्याने चक्क २० गुंठ्यामध्ये गलांडा जातीच्या फुलाची लागवड केली आहे.

ही फुलशेती उन्हाळ्यात देखील चांगली बहरली असून पांढऱ्या तसेच पिवळ्या मखमली चादरीचे आच्छादन अंथरल्यासारखा भास होत आहे. आता पर्यंत या फुलांची तोडणी करून त्यास ३० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

द्राक्ष लागवड लागवडीतून कवडीचे उत्पन्न मिळत असल्यामुळे केली फुलशेती …

या तरुणाने जानेवारीमध्ये १० -१० गुंठ्यामध्ये पिवळी म्हणजेच गलांडा आणि पांढरी म्हणजे बिजली या जातीच्या शेवंतीचे लागवड केली होती. तर महत्वाचे म्हणजे त्याच्याकडे ४ एकर मध्ये द्राक्ष असून देखील त्यांना त्यामधून काहीही उत्पन्न मिळत नसल्यामुळे त्यांनी फुलशती करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा (Read This) रेशीम शेती उत्पादकांसाठी आनंदाची बातमी, या विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी समृद्ध होणार

लागवड आणि उत्पन्न

बोअरच्या उपलब्ध पाण्याचे नियोजन करून या रोपांची २० गुंठ्यांमध्ये फुटांवर एक सरी या पद्धतीने ५० फूट लांबीच्या २० सऱ्या टाकून रोपांची जानेवारी २०२२ मध्ये लागवड केली होती.

या तरुण शेतकऱ्याने तोडीतून आतापर्यंत ३० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, आणखी ३० हजार रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा आहे. या फुलांना सध्या लग्नसराईमुळे चांगली मागणी असली तरी सध्या भाव कमी आहे. मागच्या महिन्यात जवळजवळ ५० रुपये किलो या दराने ही फुले विकली जात होती.

सध्या पांढऱ्या शेवंतीला १००० रुपये प्रति क्विंटल तर पिवळ्या शेवंतीला १५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. तर गेल्या महिन्यात ५ हजार रुपये प्रति क्विंटल असा दर होता.

आता उन्हाळा असल्यामुळे जास्त प्रमाणात माल निघत असून दरात तफावत निर्माण झाली आहे. तर ४ एकर शेती असूनही ती परवडत नसल्यामुळे फुलशेती कडे वळल्याचे शेतकऱ्याने सांगितले आहे.

हे ही वाचा (Read This) नाबार्ड डेअरी योजना, ५० टक्के अनुदान

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *