पिकपाणी

आंबट- तुरट बोर फळाची लागवड

Shares

काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत बोराच्या अनेक जाती आढळून येतात. बोर वृक्ष काटेरी , लहान असते. बोर वृक्षाच्या खोडाला अनेक शाखा फुटलेल्या असतात. बोरं सुरवातीला हिरवी असतात . जसजशी ती पिकायला लागतात तसतशी ती पिवळी , भगवी होऊन लाल रंगाची होतात. बोर पौष्टिक व चविष्ट असतात. या फळांमध्ये अ आणि क जीवनसत्वे , प्रथिने , कर्बोदके , पोटॅशिअम चांगल्या प्रमाणात उपलब्ध असतात.

जमीन –
बोर फळासाठी हलकी ते मध्यम जमीन योग्य ठरते.

जाती –
१. उमराण
२. चुहारा
३. कडाका
४. मेहरूण

लागवड अंतर –
६ x ६ मीटर लागवडीचे अंतर ठेवावे.

खते –
१. छाटणी नंतर ५० किलो प्रति झाडास शेणखत द्यावे.
२. २५० ग्रॅम स्फुरद , २५० ग्रॅम नत्र , ५० ग्रॅम पालाश प्रति झाड प्रति वर्षी द्यावे.

काढणी –
१. बी लावून तयार केलेल्या झाडांना ४ ते ५ वर्षांनी फळे धरण्यास सुरुवात होते.
२. कच्ची फळे काढल्यास नंतर ती लवकर पिकत नाहीत.

उत्पादन –
प्रति झाड ७५ ते १२५ किलो उत्पादन मिळते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *