कांदा उत्पादक शेतकरी चोहीकडून संकटात !
सुरुवातीला खरिपातील कांद्यास थोडा बरा दर मिळत होता मात्र उन्हाळी हंगामातील कांद्याची जशी आवक वाढली तसे दर खाली घसरत गेले. मागील आठवड्यात कांद्यास ९०० रुपये ते १००० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे दर होता मात्र आता हे दर ५०० ते ७०० रुपये प्रति क्विंटल वर येऊन थांबलेत.
त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यात जागतिक बाजारपेठांमध्ये आयात बंदी करण्यात आली आहे. याचा परिणाम कांद्याच्या आवक वर झाला आहे.
हे ही वाचा (Read This ) रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन
चोहीकडून शेतकरी संकटात
एकीकडे खरिपातील कांदा पिकांवर अवकाळी तसेच अतिवृष्टीचा विपरीत परिणाम झाला आहे. त्यात आता बाजारामध्ये खरिपातील कांद्याबरोबर उन्हाळी कांद्याची आवक वाढली आहे त्यामळे कांद्यास अगदी कवडीमोल दर मिळत आहे. शेतकऱ्यांचा नगदी पिकांच्या लागवडीकडे जास्त जोर असतो तर त्यांची निर्यात देखील केली जाते. मात्र सध्या निर्यात बंद असल्यामुळे शेतकरी अधिक संकटात सापडला आहे.
हे ही वाचा (Read This ) या आंतरपीकामुळे मिळेल भरघोस उत्पन्न
कांदा दराचा उतरता क्रम
लाल कांदा महिन्याभरापूर्वी ३ हजार रुपये ते ३ हजार २०० रुपये प्रति क्विंटल होता. तेव्हा कांद्याची आवक देखील मर्यादित होती. मात्र उन्हाळी कांद्याचे बाजारात आगमन होताच कांद्याने घसरत क्रम पकडला. त्यात अवकाळी तसेच ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांनी कांडा विक्रीची घाई केली त्यामुळे बाजारात मोठ्या संख्येने कांदा दाखल झाला तर दर हे ७०० रुपये ते ८०० रुपये प्रति क्विंटल वर आले. आता शेतकरी निराश झालेले दिसून येत आहे.
हे ही वाचा (Read This ) कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आता वर्षभर पाण्याचे नो टेन्शन, आलंय नवीन आगळंवेगळं तंत्र
यंदा कोरोना मुळे चांगले उत्पादन झालेल्या शेतमालाची विक्री झाली नाही तर नंतर खरीप हंगामात अवकाळी , अतिवृष्टी मुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. आता रशिया युक्रेन युद्धामुळे शेतमालाच्या किमतींमध्ये सतत चढ उतार होत असून सर्वच पिकाचे गणित हुकले. त्यामुळे शेतकरी आता त्रस्त झाला आहे.
थोडा तरी चांगला दर मिळावा यासाठी शेतकरी रात्रंदिवस एक करून कांदा काढणी, छाटणीआणि लगेचच विक्री करत आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये रात्रीतून ३०० ते ४०० ट्रक मधून कांद्याची आवक सुरु आहे.
हे ही वाचा (Read This ) हायब्रीड कारले लागवडीतून घ्या भरगोस उत्पन्न
ढगाळ वातावरण तसेच अवकाळी मुळे कांद्याची आवक कमी झाली होती. मात्र आता पुन्हा आवक वाढली आहे.
कांदा लागवडीच्या खर्चाच्या अगदी निम्मी किंमत कांद्यास मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.